धनंजय मुंडे उद्या घेणार मंत्रीपदाची शपथ

80
Adv

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तरुण , फायरब्रँड नेते, आक्रमक वक्ता त्याउपर एक उत्कृष्ट संघटक असा नावलौकिक असणारे धनंजय मुंडे हे सर्व राज्याला त्यांच्या आक्रमक , हजरजबाबी, सर्वसमावेशक, अभ्यासू वक्तृत्व शैलीमुळे परिचित आहेत.
जिल्हा परिषद सदस्य ते राज्याचा मंत्री व्हाया विधानपरिषद विरोधीप क्षनेता असा लांबलचक प्रवास मुडेंनी केला आहे.
आपले काका दिवंगत नेते गोपीनाथराव मुंडे यांच्या सोबत राजकारणात आलेले धनंजय यांनी प्रत्येक संधीचे सोने करत आपले कर्तृत्व राज्याच्या राजकारणात सिद्ध केले आहे.
गेल्या 20 वर्षांहून अधिक काळ सक्रिय राजकारणात असलेल्या धनंजय मुंडेंना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विरोधीपक्ष नेता पदाची जबाबदारी दिल्यानंतर त्यांनी तत्कालीन सरकारचे अक्षरशः वाभाडे काढले! सोळा मंत्र्यांचे घोटाळे त्यांनी पुराव्यानिशी बाहेर काढत राज्यासमोर मांडले.
धनंजय मुंडे हे सत्ताधारी पक्षाच्या मंत्र्यांना सभागृह सोडून जाण्यास भाग पाडणारे ऐतिहासीक विरोधीपक्षनेते ठरले.
शेतकरी- कष्टकरी वंचित उपेक्षित यांचा आवाज बनलेल्या धनंजय मुंडेंनी मराठा, धनगर, मुस्लिम, लिंगायत आदी समाजाच्या आरक्षण लढ्यात घेतलेल्या सक्रिय सहभागामुळे चांदा ते बांधा लोकप्रियता मिळवलेली आहे.
पक्षबांधणीमध्ये मोलाचे योगदान करणाऱ्या धनंजय मुंडे यांनी राज्यभर गाजलेल्या हल्लाबोल यात्रा, परिवर्तन यात्रा, शिवस्वराज्य यात्रा अशा सर्वच राजकीय यात्रांमध्ये सरकारविरुद्ध आपला आवाज बुलंद करत तत्कालीन सरकारला सळो की पळो करून सोडले होते. याशिवाय कोणतीही निवडणूक असो, आघाडीचा उमेदवार म्हटलं की धनंजय मुंडेंच्या सभेची मागणी असे समीकरणच आता बनले आहे!
राज्यभरात आपल्या नेतृत्व गुणांनी जनसामान्यांमध्ये आपली प्रतिमा बनवत असताना स्वतःच्या मतदारसंघावरही मुंडेंची मजबूत पकड होती. थेट लोकांमध्ये जाऊन काम करणे, तगडा जनसंपर्क, कार्यकर्त्यांची मजबूत फळी याच्या जोरावर धनंजय मुंडेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी – गृहमंत्री अमित शहा उदयनराजे, यांच्या सभा विरोधात होऊनही राज्यभर गाजलेल्या परळी विधानसभा निवडणुकीत माजी मंत्री पंकजा मुंडे यांचा तब्बल 32000 मतांनी पराभव केला.
त्याचबरोबर बीड जिल्ह्यातील 6 पैकी 4 जागांवर पक्षाचे आमदार निवडून आणले आहेत.
स्वतःची अवघड विधानसभा निवडणूक लढवत असताना राज्यभरात त्यांनी तब्बल 32 मतदारसंघात प्रचार सभा घेतल्या आणि त्यापैकी 22 ठिकाणचे उमेदवार निवडून आले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आश्वासक, तरुण, आक्रमक व अभ्यासू नेता म्हणून धनंजय मुंडे राज्याला परिचित आहेत!
सन 2010 पासून ते विधान परिषद सदस्य आहेत तर मागील 5 वर्षात त्यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पद भूषवले. बीड जिल्हा परिषदेचे ते 9 वर्ष सदस्य होते त्यापैकी 2 वर्ष त्यांनी उपाध्यक्ष म्हणून ही काम केले होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातही काही काळ त्यांनी उपाध्यक्ष आणि प्रवक्ते म्हणून काम केले. पूर्वीच्या भाजपा या पक्षातही ते युवक आघाडीचे अध्यक्ष होते.
राज्यातील एक मोठे नेते दिवंगत नेते गोपिनाथराव मुंडे यांचे पुतणे असूनही धनंजय मुंडे यांना राजकारणात कोणतेच पद त्यांना सहज मिळाले नाही तर जिल्हा परिषद सदस्य ते मंत्री आणि संघटनेत विद्यार्थी आघाडी ते पक्षाचे उपाध्यक्ष अशा प्रत्येक आघाडीवर त्यांनी स्वतःला सिद्ध करून दाखवले आहे. विस्ताराच्या अंतिम टप्प्यात मुंडेंना कॅबिनेट ऐवजी दुसरे एखादे संघटनात्मक पद दिले जाईल अशा बातम्या माध्यमांमध्ये फिरत होत्या, परंतु मुंडेंनी सर्व परिस्थितिला अत्यंत संयमी पद्धतीने हाताळले. काल – परवाच्या हिवाळी अधिवेशनात मुंडेंचे विधानसभेतील पहिले भाषण कायम स्मरणात तर राहीलच परंतु त्यांच्या राजकीय परिपक्वतेचे व पक्षनिष्ठेचे उदाहरण म्हणून अनेकांच्या नोंदीत राहील…
सत्तास्थापनेच्या घडामोडीत एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेले धनंजय मुंडे आज राज्याचे मंत्री म्हणून शपथ ग्रहण करत आहेत…

Adv