सातारा पालिकेच्या नगरसेविका यांचे पती व पालिकेचे दोन कर्मचारी यांना रविवारी दुपारी तातडीने होम क्वारंटाईन करण्यात आले त्यांच्या घशाचे स्त्राव घेण्यात येणार आहेत .
मुंबईवरून दुचाकीवर आलेला युवक शुक्रवारी साताऱ्यात आला होता . मात्र शनिवारी त्याने स्वतः जिल्हा रुग्णालयात जाऊन स्वतःची तपासणी करून घेतली . त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने साताऱ्यात एकच खळबळ उडाली . हा युवक थेट रविवार पेठेत पोहोचल्याने येथील नगरसेविच्या पतीने त्याची कागदपत्रे हाताळली नगरसेविके चे पती यांनी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाला दिली .सर्वेअर म्हणून एक अतिक्रमण व वसुली विभागाचा कर्मचारी तातडीने रविवार पेठेत रवाना झाले . तो युवक जेथे मुक्कामी राहिला त्या रूमला त्यांनी भेट दिली .
मात्र या तिघांचा संपर्क लो रिस्क प्रवर्गातील असल्याचे सांगण्यात आले .आरोग्य विभागाचे प्रमुख उपमुख्याधिकारी संचित धुमाळ यांनी नगरसेविका त्यांचे पती व दोन कर्मचारी यांच्या हातावर शिक्के मारून त्यांना दोन आठवड्यासाठी क्वारंटाईन होण्याच्या सूचना दिल्या आहेत . खबरदारीचा उपाय म्हणून या तिघांचे घशाचे स्त्राव सोमवारी घेतले जाणार आहेत असे संचित धुमाळ यांनी सांगितले .