अभियंता गाढवे दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करणार अनिता चोरगे

111
Adv

शाहूपुरी येथे पंचायत समितीचे अभियंता गाढवे साहेब यांच्या संगनमताने बांधण्यात आलेली अंगणवाडीत प्रकरणी अभियंता गाढवे दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याची माहिती शाहूपुरी गटाच्या जिल्हा परिषद सदस्य अनिता चोरगे यांनी सातारानामाशी बोलताना दिली

शाहूपुरी च्या खुल्या जागेत मंजूर असलेली अंगणवाडी दुसऱ्या जागेत बांधली कशी बांधून पूर्ण होण्याच्या अगोदरच अभियंता गाढवे यांनी ठेकेदारास चार लक्ष रुपयांचा धनादेश दिला कसा हा खरा मुद्दा असून जर ते दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाई साठी उपमुख्य अधिकारी यांच्याकडे तक्रार करणार असल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्य सौ अनिता चोरगे यांनी सातारानामाशी बोलताना दिली

मंगळवार पर्यंत संबंधित अंगणवाडीचा अहवाल येणार असल्याची माहिती खैरमोडे साहेब यांनी दिली असून सातारा नामा या प्रकरणावर लक्ष ठेऊन आहेच अजून बरेच कारणामे गाढवे यांचे सातारा नामाच्या हाती लागले आहेत

Adv