जिल्हा बँकेचा बिगुल वाजला? ठराव जमा करण्याचा कार्यक्रम पुन्हा सुरु

131
Adv

जिल्हा बँकेचा स्थगित करण्यात आलेला ठराव जमा करण्याचा कार्यक्रम राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण पुणे यांच्या 12 जानेवारीच्या आदेशानुसार पुन्हा सुरु करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा विभागीय सह निबंधक, सहकारी संस्था, कोल्हापूरचे श्रीकृष्ण वाडेकर यांनी दिली आहे.

ज्या सदस्य संस्थांनी पुर्वी ठराव जमा केलेले नसतील, अशा संस्थांनी संबंधित तालुका उप/सहायक निबंधक यांच्या कार्यालयाकडे 25 जानेवारीपर्यंत कार्यालयीन वेळेत दोन प्रतीत ठराव दाखल करुन घेणेबाबत कळविण्यात आले आहे. ठराव दाखल करण्याच्या अटी व सूचना 31 डिसेंबर 2019 रोजीच्या आदेशा नमूद केल्याप्रमाणेच असतील, असेही श्री. वाडेकर यांनी कळविले आहे

Adv