सातारा जिल्हा परिषदेच्या कामकाजावर अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष ज.मो. अभ्यंकर यांनी व्यक्त केले समाधान

194
Adv

अनुसूचित जाती जमातीच्या नागरिकांचे जीवनमान उंचविण्यासाठी  शासनाच्या असणाऱ्या विविध योजना जिल्हा परिषदेमार्फत राबविल्या जातात. या योजना सातारा जिल्हा परिषदेने प्रभावीपणे राबविल्या असून अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष ज.मो. अभ्यंकर यांनी समाधान व्यक्त केले.
अनुसूचित जाती जमातींसाठी राबविण्यात येणाऱ्या शासनाच्या विविध योजनांचा आढावा अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष ज.मो. अभ्यंकर यांनी जिल्हा परिषदेच्या सभागृहात  घेतला. या बैठकीला समितीचे सदस्य आर.डी. शिंदे, के.आर. मेढे, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक सुषमा देसाई, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव, अर्चना वाघमळे, रोहिणी ढवळे, जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण अधिकारी  डॉ. सपना घोळवे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिशन पवार, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) प्रभावती कोळेकर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) धनंजय चोपडे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी विकास सावंत यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी  उपस्थित होते.

Adv