Sunday, July 12, 2026
spot_img
Home Satara District Khatav औंध यात्रेनिमित्त महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 36 लागू

औंध यात्रेनिमित्त महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 36 लागू

292
Adv

औंध ता. खटाव येथील श्री यमाई देवीवी यात्र 10 जानेवारी  ते 24 जानेवारी 2020 या कालावधीत  साजरी होत आहे.  या अनुषंगाने पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी मुंबई पोलीस अधनियम 1951   चे कलम 36 नुसार असलेल्या अधिकाराचा वापर करुन कायदा व सुव्यवस्थेच्या बंदोबस्त कामी नेमलेल्या सर्व संबंधित पोलीस अधिकारी व त्यांच्याहून वरिष्ठ पोलीस अधिकारी यांना 10 जानेवारी ते 24 जानेवारी 2019 या कालावधीत  त्या त्या पोलीस ठाणे हद्दीतील जनतेचे स्वास्थ, सुरक्षा आणि कायदा व सुव्यवस्था अबाधीत रहावी म्हणून मिरवणुकीच्या मार्गासंबधाने मिरवणुकीतील व्यक्ती अथवा व्यक्तींच्या समुहाचे वर्तन कसे असावे, ध्वनी प्रदुषणाने मा. सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या निर्बंधाचे यथोचित पालन व्हावे या दृष्टीने आवश्यक असणारे सर्व निर्देश देण्याचे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत.

Adv