उदयनराजे यांचा मार्ग वेगळा माझा मार्ग वेगळा ़़ शशिकांत शिंदे

38
Adv

आदरणीय शरद पवार व अजितदादा यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यात व साताऱ्यात काम करत आहे. उदयनराजे आणि माझी भेट लग्नकार्यात चुकून झालेली. त्यांचे आणि माझे मार्ग वेगळे आहेत. कार्यकर्त्यांनी गैरसमज करून घेऊ नये… असा खुलासा आपल्या अधिकृत पेजवरून शशिकांत शिंदे यांनी केला आहे

भिवडी गावचा माझा कार्यकर्ता आहे त्याच्या लग्नासाठी मी गेलो असताना ही चुकून झालेली भेट आहे मी माझ्या पक्षाच्या भूमिके सोबत ठाम आहे पक्षाने दिलेल्या जबाबदाऱ्या आतापर्यंत पार पाडत आहे त्यामुळे ही भेट मर्यादीत होती ति भेट सार्वजनिक लग्नकार्यात निवडणुकीनंतर प्रथमच झाली यामध्ये कार्यकर्ते व लोकांचा गैरसमज होऊ नये यासाठी हे सत्य समोर आणत आहे असेही त्यांनी आपल्या पेजवरून खुलासा केला आहे

Adv