क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव असलेल्या नायगावसाठी १०० कोटींचा आराखडा मंजूर केलेला असून सावित्रीबाई फुले यांच्या महान कार्याला वंदन म्हणून नायगावचा सर्वांगीण विकास करणार असल्याचे आमदार मकरंद पाटील यांनी प्रतिपादन केले.
नायगाव ता. खंडाळा येथील सभेत आ.मकरंद पाटील बोलत होते. या प्रसंगी समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र नेवसे, मार्केट कमिटी चेअरमन पांडुरंग नेवसे, माजी सरपंच मनोज नेवसे, ग्रामपंचायत सदस्य हणमंत नेवसे, सागर नेवसे, सोसायटीचे चेअरमन नितीन नेवसे, सदस्य अनिल नेवसे, खरेदी विक्री संघाचे संचालक रघुनाथ नेवसे आदी मान्यवर, ग्रामस्थ उपस्थित होते.
या प्रसंगी आ. मकरंद पाटील म्हणाले, मागील १५ वर्ष माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तुम्ही आपल्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली. सामान्य माणूस केंद्र बिंदू मानून मी मतदार संघाचा विकास केला. मतदार संघात तब्बल ४००० कोटींची विकासकामे केली. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव नायगावच्या विकासाचा १०० कोटींचा आराखडा मंजूर केला आहे. देवधरचे पाणी वाघोशी पर्यंत ६५ किमी अंतरापर्यंत पोहोचविण्यात मी यशस्वी झालोय. हे ३.३३ टीएमसी पाणी आपल्या वाटणीच आहे.या योजनेने २७००० एकर क्षेत्र ओलिताखाली येणारआहे.
विरोधक आरोप करतात की हे पाणी बारामती फलटणला जाणारे पण मी हमी देतो आपल्या वाट्याच्या पाण्यातील एक थेंब पाणी बाहेर जाऊन देणार नाही.पाणी वाया जात म्हणून बंदिस्त पाईप लाईन करण्याचा निर्णय सरकारने घेतलाय. आपल्या वाट्याचे संपूर्ण पाणी वापरून ही १.१८ टीएमसी पाणी शिल्लक राहणारे ते राहिलेल्या १४ गावांना मिळणारे. मी दिवसरात्र काम केलंय. विरोधक म्हणतात सत्ता एका घरात. पण मला आमदारकी तुम्हीच दिली नामागील निवडणुकीत १३१००० मते मला दिली आहेत. तेवढी मते महाराष्ट्रात कोणाला नाहीत. कारखाना तुम्ही ताब्यात घेण्यासाठी आग्रह केला.
महायुती मुळेच आपल्याला ४६७ कोटी मिळाले. कारखान्यावरील संकट टळले. कारखाने वाचविण्यासाठी शेतकऱ्यांनी ३२ कोटी दिले. २०२१ चे १२८०० शेतकऱ्यांचे ५४ कोटी रुपये, जे बुडाल्यात जमा होते ते पैसे शेतकऱ्यांना दिले. कारखाना आणि विधानसभेची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडतोय. तुम्हाला कमी पना येईल असे एखादे तरी कृत्य माझ्या हातून घडलंय का. १०७००० लाडक्या बहिणींना प्रत्येकी ७५०० मिळाले. समाजातील प्रत्येक जातीचे स्वातंर्त्य महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय सरकारने घेतलाय.भाजपाचे नेते संभाजीराव जाधव, पाटील म्हणाले की मी ज्या पक्षाचे काम करतो त्या पक्षाने एक सिस्टीम राबवली आहे.म्हणूनच आम्ही आ.मकरंद आबांच्या विजयासाठी जिवाचं रान करणार आहोत. आबांचे काम बोलते त्यामुळेच आबा प्रचंड मताधिक्याने निवडून येणार आहेत.
पांडुरंग नेवसे म्हणाले, आपलं पाणी आपल्यालाच मिळालं आहे. आबांनी १००० कोटी कर्ज असलेले कारखाने ताब्यात घेण्याचे धाडस केलं. सरकारने ४६७ कोटी थक हमी दिल्याने कारखाने वाचले. आबांचे कुटुंब मतदार संघात प्रत्त्येक सुख दु:खात सहभागी होणारे कुटुंब आहे. गोरख साळेकर म्हणाले, मंत्रालयातील कोणतीही व्यक्ती असो सर्व अधिकाऱ्यांना आबांच्या सूचना असतात की माझ्या माणसांचे काम झालं पाहिजे.