2009 ते 2019 अशी सलग 3 वर्षे वाई विधानसभा मतदारसंघातून प्रचंड चढत्या अशा विक्रीमी मतानी निवडून येण्याचा विक्रम आमदार मकरंद पाटील यांच्या नावावर असून उद्याच्या होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत आमदार मकरंद आबा विधानसभेचा विजयी चौकार मारणार हे नक्की
वाई खंडाळा महाबळेश्वर मतदारसंघ महाराष्ट्रात सर्वात मोठा म्हणून प्रसिद्ध आहे या मतदारसंघात पाचगणी महाबळेश्वर किल्ले प्रतापगड वाई व शूटिंग करण्यासाठी प्रसिद्ध असलेला मेनवली घाट हा याच मतदारसंघात येत असून या मतदारसंघात मकरंद आबांना निवडणुकीत तोड देईल असा तगडा उमेदवार सध्या तरी नसल्याने एकतर्फी विजयी चौकार आ मकरंद आबा मारणार यात तीळ मात्र शंका नसल्याची चर्चा जिल्ह्यात रंगत आहे
शरद पवार गटाकडे तगडा उमेदवार नसल्याने वाई विधानसभा मतदारसंघात मकरंद आबांचा विजय निश्चित मानला जात असून किसनवीर कारखाना अडचणीत असताना व्यवस्थित रित्या चालवला खंडाळा कारखाना चालवला त्यामुळे या मतदार संघातील मतदार राजांचा पूर्ण विश्वास मकरंद आबा यांच्यावर असून आबा सांगतील ते धोरण बांधतील ते तोरण अशी म्हण येथील मतदार राजा म्हणत आहेत