प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्या उपस्थितीत दोन्ही राजेंचा उद्या निवडणूक अर्ज दाखल होणार

69
Adv

श्री. छ. उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे उमेदवारी अर्ज दाखल करणार

मंगळवार दि.१ ऑक्टोबर रोजी सकाळी ठिक १० वाजता गांधी मैदान, राजवाडा येथून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास जाताना भव्य मिरवणुकीचा प्रारंभ होणार आहे. त्यावेळी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील ना. शेखर चरेगावकर, भारतीय जनता पक्षचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, विनीत कुबेर तसेच पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी, जिल्हा परिषद, सदस्य पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायत, ग्रामपंचायत आदींसह स्थानिक स्वराज संस्था, सहकारी संस्था यांचे सदस्य, नगराध्यक्ष, नगरसेवक, सरपंच तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. गांधी मैदान येथून सकाळी दहा वाजता ढोल-ताशाच्या गजरात मिरवणूक निघणार असून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे असे आवाहन करण्यात आले आहे.

Adv