उत्तर भागात सुसाट वाऱ्याने ऊसाच्या पिकांचे नुकसान होऊन,ऊस भुईसपाट झाले आहेत

77
Adv

पिंपोडे बुद्रुक,दि.७…. . जून,जुलै आणि ऑगस्ट या तीन महिन्यात मोसमी पाऊस चालू राहतो,मात्र अद्याप तशा पावसाची चिन्हे दिसत नसून,कमी दाबाचे,व वळवाचे पाऊस होत आहेत. शेतकऱ्यांचे आणि हवामान खात्याचे अनुमान, कोरडे ठरत आहेत.परंतु या सुसाट वाऱ्यामुळे पिकाचे नुकसान झाले आहे.
विश्रांती घेतलेल्या पावसाने आसनगांव,देऊर,घिगेवाडी,दहिगाव डोंगर परिसराबरोबर उत्तर कोरेगांव भागात पुन्हा सुरुवात केली आहे.पाऊस कमी वादळी वाऱ्याने पिके भुईसपाट होऊ लागली आहेत. खरीप पिकांना हा पाऊस उपयुक्त आहे.परंतु मका,ऊस ही पिके जमीनदोस्त होतानाचे चित्र पाहायला मिळत आहे.पावसाच्या आशेवर बळीराजाने खरीपाच्या पेरण्या उरकुन घेतल्या.पिक सुध्दा जोमात आहेत. जून अखेर पेरण्या झाल्या पावसाने उघडीप दिल्याने शेतकर्यांनी शेतीची कामे करुन घेतली त्यामध्ये मशागत असेल, कोळपणी असेल,तसेच शेतीची इतर कामे करून घेतली . जुलैमध्यावंर पावसाने शेतकऱ्यांची धास्ती वाढवली होती परंतु आत्ता अधुन मधून सरी येत राहील्याने पिक वाढीला उपयुक्त ठरल्याने खरिपाची पिके जोमदार आहेत.

चांगल्या पावसाची अपेक्षा असतानाच सलग दोन ते तीन दिवस पावसाने वादळीवाऱ्यासह हजेरी लावली. त्याच्या उपयोग खरीप पिकाला होणार आहे,परंतु पावसाबरोबर वाहणाऱ्या वादळी वाऱ्याने पिकांचे नुकसान व शेतकऱ्याची चिंता वाढली आहे. सुरुवातीला मध्यम स्वरुपाचा पाऊस झाल्याने पिके उत्तम प्रकारे वाढली,परंतु ऊस व मका ही पिके या वादळी वाऱ्यामुळे भुईसपाट होत आहेत . याचा विपरित परिणाम होऊन नुकसान होण्याची दाट शक्यता वाढली आहे.

Adv