साताऱ्यात आणखी शंभर बेडच्या हॉस्पिटलला मंजूरी केंद्रीय कामगार कल्याण मंत्रालयाची मंजूरी

1113
Adv

केंद्रीय कामगार मंत्रालयाच्या अखत्यारितील ईएसआय कार्पोरेशन मार्फत साता-यामध्ये नवीन १०० खाटांचे रुगणालय सुरु करण्यास मंजूरी मिळाली आहे. ईएसआय कार्पोरेशनच्या तर्फे याबाबतची अधिकृत घोषण केंद्रीय कामगारमंत्री ना. भुपेंद्रसिंह यादव यांनी केली आहे. साता-यात सैनिक हॉस्पिटल आणि ईएसआय हॉस्पिटल उभारणीबाबत आमचा सातत्याने पाठपुरावा चालु आहे त्यापैकी १०० खाटांचे ईएसआयसीचे हॉस्पिटल करीता मंजूरी मिळाल्याने, याचालाभ जिल्हयातील ईएसआय योजना लागु असणा-या लाखो कामगारांना होणार आहे अशी माहीती खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिली आहे.

सक्षम सार्वजनिक आरोग्य सुविधा ही आज काळाची गरज बनली आहे असे नमूद करुन खा श्री छ उदयनराजे भोसले यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात पूढ़े नमुद केले आहे की,
कोरोना काळात राज्यातील सार्वजनिक आरोग्य सेवकांनी अतिशय चांगले कार्य केले आहे. सार्वजनिक आरोग्य
यंत्रणांवर ताण येवू नये म्हणून अधिकाधिक सार्वजनिक सुविधा विविध माध्यमातुन सुरु करण्यासाठी आम्ही सैनिक हॉस्पिटल आणि ईएसआय हॉस्पिटिल स्वतंत्रपणे सुरु करणेबाबत केंद्रशासनाकडे प्रस्तावित केलेले आहे.त्याचा सातत्याने
आमच्याकडून पाठपुरावा देखिल सुरु आहे. केंद्र शासनाच्या कामगार खात्याच्या अखत्यारित येणा -या ईएसआयका्पोरेशने महाराष्ट्रात सहा ठिकाणी १०० खाटांचे रुण्णालय सुरु करण्या बाबत धोरण आखले असून, त्या धोरणान्सार महाराष्ट्रात पालघर, सातारा, पेण, जळगांव, चाकण आणि पनवेल या ठिकारणी ईएसआय हॉस्पिटलची उभारणी करण्याचे निश्चित केले आहे. संपूर्ण देशात २३ ठिकाणी अशी हॉस्पिटल्स सुरु करण्यात येणार असून, पैकी सर्वात जास्त महाराष्ट्रात सहा ठिकाणी रुग्णालयांची उभारणी होणार आहे ईएसआय हॉस्पिटलच्या उभारणीकरीता काही जागां आम्ही सूचवलेल्या आहेत, त्यापैकी एका जागेची निश्चिती करण्यात येणार आहे. जागा निश्चिती झाल्यावर या ठिकाणी ईएसआय कापरिशनचे १०० खाटांचे रूण्णालयाची उभारणी करण्यात येईल,सातारा जिल्हयात कामगारांची संख्या मोठी आहे. तसेच ईएसआय योजना लाग् असेलेले कामगार सुध्दा काही लाखात आहेत. त्या सर्व कामगारांना या रुग्णालयाचा मोठा आधार लाभणार आहे. लवकरच मिल्ट्री हॉस्पिटल देखिल सुरु होण्यासाठी आमचा अखंड पाठपुरावा सुरु आहे असेही खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी नमुद केले आहे.

Adv