पोलीस क्रीडा प्रबोधिनीत लाल मातीतील कुस्ती खेळाचा समावेश

40
Adv

सातारा जिल्हा पोलीस क्रीडा प्रबोधिनी व सातारा पोलीस कल्याण निधीअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या नवीन क्रीडा लाल मातीतील कुस्ती आखाडा आजपासून नव्याने कुस्ती मल्लांसाठी सुरु करण्यात आला आहे याचे उद्घाटन पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या हस्ते करण्यात आले.
                यावेळी सहायक पोलीस अधीक्षक समीर शेख, पोलीस उपअधीक्षक (गृह) राजेंद्र साळुंखे, पोलीस निरीक्षक अंकुश यादव, पोलीस कल्याणचे श्री. वाघ, जिल्हा क्रीडा प्रबोधिनीचे व्यवस्थापक शिवाजी जाधव आदी उपस्थित होते.
                पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला आहे. पोलीस व पोलिसांच्या कुटुंबीयांना आणि नागरिकांकरिता लाल मातीतील कुस्ती हा उपक्रम नव्याने सुरु करण्यात आला आहे. पोलीस क्रीडा प्रकारांमध्ये जुदो, बॉक्सिंग, आर्चरी, मल्लखांब, कुस्ती, फुटबॉल, व्हॉलीबॉल यासह विविध खेळांचे प्रशिक्षण वर्ग सुरु आहेत. प्रबोधिनीचे उपक्रम सुरु झाल्यापासून आत्तापर्यंत विविध खेळ प्रकारातील खेळाडूंनी तालुकास्तरावर व राज्यस्तरापर्यंत 185 पेक्षा जास्त पारितोषिके मिळविले आहेत. तरी इच्छुक खेळाडूंनी सातारा पोलीस क्रीडा प्रबोधिनीचा लाभ घ्यावा, असे आवाहनही पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी केले आहे.

Adv