महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आपली जीवाची बाजी लावणारे आ सदाभाऊ खोत यांना आता सातारा जिल्ह्यातील सोन्या मोन्या व भोळ्या शंकरा चा विळखा बसला असून यांच्यामुळे जिल्ह्यातील संघटनेतील कार्यकर्ते नाराज असून यांना वेळीच आवर घाला अशी मागणी होऊ लागली आहे
सदाभाऊ खोत कृषी राज्यमंत्री असताना जिल्ह्यातील सोन्या मोन्या आणि भोळ्या शंकरा ने कृषी विभागात लाखोचा मलिदा हाणला म्हणून आज हे च सोन्या मोन्या आणि भोळ्या शंकर सावसूद असल्याचा प्रयत्न जनतेसमोर करत असून ज्या शेतकऱ्यांसाठी सदाभाऊ खोत यांनी आपली जीवाची पर्वा न करता बाजी लावली प्रसंगी स्वतःचे रक्त सांडले त्यांच्या कार्याला डाग लावण्याचे काम सातारा जिल्ह्यातील सोन्या मोन्या आणि भोळ्या शंकर करत असून सदाभाऊ या सोन्या मोन्या आणि भोळ्या शंकरा ला वेळीच आवरा असे म्हणण्याची वेळ आता आली आहे
सदाभाऊ आपण कृषी मंत्री असताना या सोन्यामोन्या व भोळ्या शंकराची कॉलर कायम टाईट होती मात्र हीच मंडळी आज तुमच्या नावाने अनेक ठिकाणी लक्ष्मी दर्शन गोळा करून स्वतःची हौसमौस करताना दिसत आहेत त्यामुळे संघटना महत्वाची सोन्या मोन्या आणि भोळा शंकर नव्हे अन्यथा थोरल्या शंकराचा अनुभव सदाभाऊ आपल्याला कमी नाही म्हणून या भोळ्या शंकरास् व सोन्या मोन्यास संघटनेची नियम व अटी घालून द्या अशी मागणी जनतेतून होत आहे