गर्भलिंग तपासणीसाठी सोनोग्राफी करणे कायद्याने गुन्हा आहे. अशा प्रवृत्तींविरोधात कारवाई करण्यासाठी प्रशासनाची कठोर भूमिका घेतली असून आपल्या सभोवतालच्या परिसरात अशी तपासणी अनधिकृतपणे कोणी करीत असेल अशा डॉक्टर तसेच दवाखान्यांची माहिती 18002334475 या टोल फ्री क्रमांकावर माहिती द्यावी, असे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी आज केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहामध्ये गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदानतंत्र जिल्हास्तरीय दक्षता समितीची बैठक प्रभारी जिल्हाधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस जिल्हा शल्य चिकीत्सक अमोद गडीकर, अप्पर पोलीस अधिक्षक धिरज पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अनिरुध्द आठल्ये, जिल्ह्यातील सर्व उपजिल्हा तसेच ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक तसेच जिल्हास्तरीय दक्षता समितीचे शासकीय सदस्य तसेच अशासकीय सदस्य उपस्थित होते.
समाजातील स्त्री-पुरुष समतोल राखण्यासाठी शासनाने लिंग निवडीस प्रतिबंध कायदा तयार केला आहे. या कायद्यान्वये डॉक्टर्स व दवाखान्यांकडून गर्भलिंग तपासणी करण्यासाठी दुरुपयोग केल्यास दंड तसेच कारावास होऊ शकतो. गर्भ लिंग निवडीस प्रतिबंध कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींची माहिती देणाऱ्यास 1 लाख रुपयांचे बक्षीस संबंधितांवर खटला दाखल झाल्यानंतर दिले जाते. जिल्ह्यात 436 नोंदणीकृत सोनोग्राफी सेंटर्स असून प्रत्येक तालुक्यात सोनोग्राफी सेंटर्स तपासणीसाठी जाण्याऱ्या समूचित प्राधिकाऱ्यांनी डमी रुग्ण पाठवून प्रत्यक्ष गर्भलिंग तपासणी होते की नाही याची तपासणी देखील करावी. यासाठी पोलीसांचे देखील सहकार्य घ्यावे. सामाजिक कर्तव्य म्हणून सजग नागरिकांनी तसेच सामाजिक संस्थांनी अनधिकृतपणे गर्भलिंग तपासणी करणा-यांची माहिती जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकीत्सक, उपजिल्हा रुग्णालय किंवा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक किंवा 18002334475 या मोफत् हेल्पलाईन क्रमांकावर किंवा www.amchimulgi.gov.in या वेबसाईटवर माहिती देऊन तक्रार नोंदवावी.
000
Home Satara District गर्भलिंग तपासणीसाठी सोनोग्राफी करण्याऱ्यांवर प्रशासनाची कठोर भूमिका; -रामचंद्र शिंदे