राष्ट्रवादीचे नेते शारदा जाधव शिवसेनेच्या फ्लेक्सवर

10
Adv

साताऱ्यात शिवसेना संपर्कप्रमुख यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा फलक लागले असून या फ्लेक्स वर चक्क राष्ट्रवादीच्या नेत्या शारदाताई जाधव यांचे फोटो लावल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे

पंचायत समिती निवडणुकीच्या दरम्यान शारदाताई जाधव यांनी आपल्या पक्षाकडे पदाचा राजीनामा दिला व पंचायत समिती निवडणूक ही राष्ट्रवादीच्या चिन्हावर लढवली त्यामुळे त्या शिवसेनेत कधी परतल्या ही चर्चा साताऱ्यात फ्लेक्सवरून रंगत होती

शिवसेनेच्या महिला संपर्कप्रमुख या फ्लेक्स वर नसल्याने नक्की शिवसेनेत चालले काय असाच प्रश्न उपस्थित होत आहे राष्ट्रवादीच्या नेत्या फ्लेक्स वर आणि शिवसेनेच्या नेत्या फ्लेक्सच्या बाहेर अशीच परिस्थिती सध्या त्या फ्लेक्स वर पाहायला मिळते

शिवसेनेचे त्या फ्लेक्सने अनेक जणांना राजकीय बुचकाळ्यात पाडले असले तरी नक्की शारदाताई जाधव कोणत्या पक्षात असा संभ्रह त्या फ्लेक्स निर्माण होत असून नेत्यांचाफ्लेक्स वर फोटो लागल्याने चर्चेला उधाण आले आहे

Adv