शनिवारी खा नितीन पाटील यांचा सत्कार

301
Adv

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्यावतीने राज्यसभेचे नवनिर्वाचित खासदार नितीन पाटील यांचा जाहीर सत्कार आणि पदाधिकारी मेळावा येत्या शनिवारी (ता. 31) सकाळी दहा वाजता हॉटेल लेक व्हिव येथे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस श्रीनिवास शिंदे यांनी दिली आहे.

या मेळाव्यास विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर, आमदार मकरंद पाटील, दीपक चव्हाण, जिल्हाध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, कार्याध्यक्ष अमित चव्हाण, जिल्हा बँक संचालक राजेंद्र राजपुरे, किसन वीर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रमोद शिंदे, यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी उपस्थित राहावे असे आवाहन श्री. शिंदे यांनी केले आहे.

Adv