Thursday, July 23, 2026
spot_img
Home Politics|Satara District Satara City किरण मानेंवर गुन्हा दाखल करण्याची शिवसेनेची मागणी

किरण मानेंवर गुन्हा दाखल करण्याची शिवसेनेची मागणी

553
Adv

सातारा : प्रतिनिधी
सोशल मीडियाच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत आक्षेपार्ह पोस्ट करणारा किरण माने याच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करावा अशी मागणी सातारा शहरप्रमुख निलेश मोरे व पदाधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्याकडे निवदेनाद्वारे केली आहे.
उद्धव ठाकरे गटाचे किरण माने हे वारंवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिवसेनेबाबत सोशल मीडियाच्या माध्यमातून तसेच लोकहित्याच्या विरोधात वक्तव्य करत आहेत. नागरिकांना भडकवण्याचे प्रयत्न करत आहेत. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट केली असून चुकीची विधाने करत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करावा तसेच त्यांना अशी वक्तव्य करण्यास भाग पडणाऱ्या मास्टर माईंडचा शोध घेऊन त्याला अटक करावी. तसेच एकनाथ शिंदे यांच्यावर कोणीही आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी शहर संघटक अमोल इंगवले, उपशहर प्रमुख विक्रम यादव, अजिंक्य राजपूत, अमोल खुडे, शुभम भिसे, सिद्धेश जाधव, धीरज सकपाळ, प्रथमेश बाबर, यश खत्री, युवराज यादव, संदीप पवार, प्रेम साळुंखे आदी शिवसैनिक उपस्थित होते.

Adv