सातारा शहराला पाणी पुरवठा करणारा कास तलाव शंभर टक्के भरल्याने सातारकारांची पाण्याची चिंता मिटली
अवकाळी पावसामुळे गेल्या एक महिन्यापूर्वी सातारा शहराला पाणी पुरवठा करणारा कास तलाव 91 टक्के भरला होता त्यानंतर पावसाने आठ दिवस उघडीप घेतली होती आता सततच्या पडणाऱ्या पावसाने सातारा शहराला पाणीपुरवठा करणारा कास तलाव आज सायंकाळी 7:30 च्या सुमारास शंभर टक्के भरल्याने सातारकरांची वर्षभराची पाण्याची जनता मिटली आहे
पावसाचा जोर वाढला की कास तलाव कधी भरणार याकडे सातारकरांचे लक्ष लागले असते गेल्या काही दिवसांपासून पाऊसाने चांगला च जोर धरल्याने कास तलाव ओव्हर फ्लो झाल्याने सातारकरांची पाण्याची चिंता मिटली आहे
सातारा शहराची लाईफ लाईन असणारा कास तलाव गुरुवारी ओसंडून वाहू लागला यावर्षी प्रथमच का तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे तलावामध्ये आता अर्धा टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे त्यामुळे सातारकरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली आहे
सातारा पालिकेने सुरू ठेवलेली पाणी कपात लवकरच मुख्याधिकाऱ्यांच्या मान्यतेनंतर मागे घेतली जाणार आहे महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर द्रोणीय स्थिती निर्माण झाल्याने कमी दाबाचे क्षेत्र विकसित होऊन पश्चिम घाट परिसरामध्ये मुसळधार पाऊस होत आहे सातारा जिल्ह्याला गेल्या दोन दिवसापासून मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे त्याचा दृश्य परिणाम सातारा जिल्ह्यातील पश्चिम भागात विशेषता महाबळेश्वर कास बामनोली पाटण जावली तालुक्यातमुसळधार पाऊस होऊन ओढे म्हणाले खळखळून वाहू लागले आहेत सातारा शहराला पाणीपुरवठा करणारा कास तलाव पूर्ण क्षमतेने गुरुवारी सकाळीच भरला आणि येथील नव्या सांडव्यावरून पाणी वाहू लागले काच तलावात आता तब्बल साठ फूट पाणीसाठा झाला आहे हे पाणी सातारकरांना वर्षभर पुरत असते अर्धा टीएमसी पाणीसाठा असलेल्या कास तलावाचे नयनरम्य सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे सातारा शहरासाठी तलावातून दररोज दहा लाख लिटर पाणी उचलले जाते जून मध्येच यंदा पहिल्यांदा पूर्ण क्षमतेने कास तलाव भरल्याने सातारकरांनी समाधान व्यक्त केले आहे