अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेल्या कष्टकरी शेतकऱ्यांना नुकसानीचा मोबदला भरपाई तातडीने मिळाला तरच तो सावरला जाईल, याकामी आपण स्वत:संबंधीतअधिकाऱ्यांना कार्यवाही करावयाची आदेश द्यावेत,अश्या सूचना जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांना दिल्या असल्याची माहिती साताऱ्याचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिली आहे
15 ऑक्टोबर अखेर संपणारा खरीप हंगाम संपत आला आहे. तरीही जागतिक हवामानातील बदलांमुळे सातारा जिल्ह्यात सर्वत्र सप्टेंबर महिन्यात अवेळी पाऊस पडत आहे. सातारा जिल्ह्यात प्रामुख्याने घेतल्या जात असलेल्या हळद, आले,बटाटा, स्ट्रॉबेरी,पालेभाज्या,भुईमुग, ऊस, भातपिके,बाजरी,ज्वारी, टोमॅटो, द्राक्षे,आदी खरीप पिकांचे अवकाळी पावसामुळेअतोनात नुकसान होत आहे.हाताला आलेली पिके मुळांना हवा मिळत नसल्यामुळे कुजलेली आहेत. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी आपल्या विभागामार्फत, नुकसान झालेल्या पिकांची पहाणी व पंचनामे करावेत.
जागातिक तापमानातील झालेल्या बदलामुळे यंदाच्या वर्षी सप्टेंबर महिन्यात देखिल बराच मोठा पाऊस सातारा जिल्ह्यात सर्वत्र झाला आहे. त्यामुळे हाताशी आलेली पिके, सततच्या पावसामुळे कुजून गेली आहेत तर काही पिके कुजण्याच्या मार्गावर आहेत. पूर्ण वाढ झाली नसल्याने पिकांची काढणीही करता येत नाही, अश्या व्दिधा मनस्थितीत जिल्ह्यातील शेतकरी सापडलेला आहे. हीच परिस्थिती अति पावसामुळे राज्यात सर्वत्र कमी जास्त प्रमाणात दिसून येत आहे.
सातारा जिल्ह्यात प्रामुख्याने, आले, हळद, उस, बटाटा, टामॅटो, महाबळेश्वरमधील स्ट्रॉबेरी, ज्वारी, बाजरी,भात, पालेभाज्या,आदी पिके कुजून नष्ट झाली आहेत. शेतकऱ्याने मेहनतीने केलेल्या लागणीची पिके हाताशी आल्यावर, अशी परिस्थिती उद्भवली असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे विस्कटले दिसून येत आहे. या परिस्थितीत सातारा जिल्ह्यातील पिकांचे करुन, किंबहुना, नुकसान झालेल्य पिकांचे, स्वतंत्रपणे प्रति एकरी प्रति पिकांप्रमाणे किती रुपयांचे नुकसान झाले आहे याचे सरसकट पंचनामे करावेत.
शेतकऱ्यांना अवेळी-अवकाळी झालेल्या पावसामुळे झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई शासनाकडून शक्य तितक्या लवकर प्राप्त करुन देण्यासाठी कृषी आणि महसुल विभागाने तातडीने योग्य ती कार्यवाही करावी या करीता, सातारचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांचेशी आम्ही चर्चा करताना सूचना केल्या आहेत.
अश्या वेळी-अवेळी होणा-या पावसामुळे शेतक-यांचे कोणतेही नुकसान होवू नये म्हणूनच आम्ही ईर्मा योजना लागु करावी अशी मागणी, तत्कालीन शासनाकडे भुमाता गौरवदिंडीच्या माध्यमातुन सुमारे 13 वर्षापासून वेळोवेळी केली आहे. ईर्मा योजना लागु असती तर अवकाळी होणा-या पावसामुळे होणारे नुकसान, ईर्मा योजनेमधुन भरुन निघाले आहे. परंतु ईर्मा योजना लागु नसल्याने शासनाने याकामी तातडीने मदत दिली पाहीजे.

अवकाळी पावसामुळे होणा-या नुकसानी बाबत,भरपाई मिळण्याकरीता राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांचेशी आम्ही सविस्तर बोलणार आहोतच, तथापि वेळ प्रसंगी केंद्रीय कृषी मंत्री ना. नरेंद्रसिंह तोमर व अर्थ राज्यमंत्री भागवत कराड, अर्थ मंत्री निर्मलाजी सितारामन यांचेशी देखिल भेट घेवून, शेतकऱ्यांना भरीव सहाय्य मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.





