सातारा जावली मतदारसंघात उदयनराजे दौरे विरोधकांना धास्ती देणारे

586
Adv

भाजपचे खासदार श्री छ उदयनराजे भोसले यांचे राजकीय धक्कातंत्र अफलातून आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि सध्या बाजारसमितीच्या सुरू असलेल्या निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर छ उदयनराजे यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे यांचे प्रभावक्षेत्र असणाऱ्या जावली तालुक्यात गाठीभेटींचे सत्र गतिमान केले आहे छ उदयनराजे यांच्या या दौऱ्याचे राजकीय संदर्भ लावले जात आहेत .

भाजपच्या केंद्रीय समितीने खा छ उदयनराजे भोसले यांना महाराष्ट्रात मोठी जवाबदारी देण्याचे सूतोवाच केले होते मात्र छ उदयनराजे यांचे राजकीय वलय महाराष्ट्रात नव्हे तर देशात सर्वत्र आहे महाराष्ट्रातील राजकीय जवाबदारी पेलण्याच्या बरोबरीने सातारा जिल्ह्यातही प्रभावक्षेत्र मजबूत करण्याच्या दृष्टीने उदयनराजे पावले टाकत आहे सातारा जावली विधानसभा मतदारसंघ त्यांनी मोर्चेबांधणीच्या दृष्टीने लक्ष्य केला आहे आमदारांच्या जावली तालुक्यात कुडाळ येथे छ उदयनराजे भोसले यांनी दौरा करत पिंपळेश्वरच्या यात्रेला हजेरी लावली . सुमारे तीन तास छ उदयनराजे तेथे तळ ठोकून होते कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी आणि छ उदयनराजे यांनी केलेली विचारपूस राजकीय चर्चेचा विषय ठरली जावलीत अमित कदम यांनी नुकताच राष्ट्रवादीत प्रवेश केला विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी कोणी सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही हे सूचक वक्तव्य केले होतेजावलीत राष्ट्रवादीने मोटबांधणीचा प्रयत्न केला आहे यामध्ये महत्वपूर्ण ठरणाऱ्या अमित कदमांची साताऱ्यात एका औपचारिक कार्यक्रमात खा छ उदयनराजे यांची गाठ पडली या भेटीचे सुध्दा अनेक राजकीय अर्थ लावण्यात आले साताऱ्याच्या राजकारणाला पक्षीय पेक्षा वैयक्तिक प्रभावाचे संदर्भ जास्त आहेत शिवेंद्रसिंहराजे यांनी पालिका निवडणूका भाजपसोबत लढण्याचा निर्णय जाहीर केला आहे मात्र शिवेंद्रसिंहराजे यांना साताऱ्यात धक्का देण्यासाठी विरोधकांच्या मोट बांधणीचा प्रयोग होऊ शकतो त्याला खा छ उदयनराजे यांचा पाठिंबा मिळणार ते धक्कातंत्र काय असणार याची उत्तरे भविष्याच्या राजकारणात दडली आहे परळी खोऱ्यात आंबळे येथील यात्रेतही तलवार उंचावत कार्यकर्त्याकडे वाकड्या नजरेने पाहू नका असा जाहीर इशारा छ उदयनराजे यांनी शिवेंद्रसिंह राजे यांना दिला होता आमची नजर व कामे सरळच आहेत असे प्रत्युत्तर शिवेंद्रसिंह राजे यांनी दिले होते या राजकीय कलगीतुऱ्याचे पडसाद उमटत आहेत मात्र सातारा विधानसभा मतदारसंघात उदयनराजे यांचे वाढते दौरे विरोधकांना अस्वस्थ करणारे ठरले आहेत .

Adv