महाराष्ट्र राज्याच्या ग्रामविकास मंत्रालयाच्या अखत्यारितील 2515 या लेखाशिर्षाखाली, सातारा जिल्हयातील विविध तालुक्यातील गावांमध्ये सुमारे 5 कोटीं भरीव निधी मंजूर करण्यात आला असुन सर्व कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे,अशी माहीती खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिली आहे.
लोकहितांच्या विकास कामांना आम्ही नेहमीच प्रथम प्राधान्य देत आलो आहोत. त्याच दृष्टीकोनामधुन जास्तीत जास्त निधी उपलब्ध होण्यासाठी आम्ही विशेष प्रयत्न करीत असतो.त्याचाच भाग म्हणून राज्याच्या ग्रामविकास मंत्रालयाच्याअखत्यारितील 2515 या लेखाशिर्षाखाली आम्ही विविध कामे सुचविली होती. नुसती कामे सुचवून आम्ही थांबलो नाही तरीत्या कामांना मंजूरी मिळण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले त्यामुळेच आज 2515 मधुन एकूण 51 कामांना 5 कोटींचानिधी मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये वाई तालुक्यातील मौजेनिकमवाडी येथे नळकांडीपूल बांधणे, बावधन येथे नवीन गावठाणामधील खडीकरण व डांबरीकरण करणे.कोरेगांव तालुक्यातीलतांदूळवाडी येथे बंदीस्त गटर,मौजे सोनके येथे सभामंडप बांधणे, मौजे ल्हासुर्णे येथे सचिवालय बांधणे,मौजेवडाचीवाडी येथे ग्राम सचिवालय बांधणे,मौजे कटापूर येथील अंतर्गत रस्ते खडीकरण डांबरीकरणे करणे, मौजेशिरढोण येथील स्मशानभुमी संरक्षक भिंत व रस्ता खडीकरण करणे, देऊर येथे सभामंडप बांधणे, मौजे चिमणगांव येथे मागसवर्गीय वस्तीत सभामंडप बांधणे, मौजे हसेवाडी येथील अंतर्गत रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे.
सातारा तालुक्यातील खोजेवाडी येथे पेव्हर ब्लॉक बसविणे, कुसवडे ग्रामसचिवालय बांधणे, बसाप्पाची वाडी येथेनळकांडी पूल बांधणे, देगांव ग्रामसचिवालय बांधणे, वेळेकामथी येथील मानेवाडी रस्ता कॉक्रीटीकरण करणे,मालगांव जिल्हापरिषद शाळेपासून रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे, तासगांव येथील भोसले वस्ती येथे समाजमंदीर बांधणे, डोळेगांव येथेसभा मंडप बांधणे, भरतगांववाडी येथील अंतर्गत रस्ता खडीकरणडांबरीकरण करणे, आसगांव अंतर्गत रस्ता कॉक्रीटीकरण करणे,पाडळी चौकातील कॉक्रीटीकरण करणे, अनावळे येथे सभामंडपबांधणे. मौजे चिंचणेर वंदन येथील चव्हाण घर ते बाजारतळापर्यंत संरक्षण भिंत बांधणे. मौजे कोंडवे येथील दिव्यनगरी येथे कोणार्क सोसायटीमधील रस्ता कॉक्रीटीकरण करणे.मौजेलिंब येथे अंतर्गत आर.सी.सी गटर बांधणे, मौजे वाढे येथे अंतर्गत बंदिस्त गटर व रस्ता करणे,मौजे पेट्री-अनावळे येथे अंतर्गत
रस्ता कॉक्रीटीकरण करणेमौजे पिलाणी येथे सभामंडप बांधणे, मौजे जकातवाडी कॉलनी येथील अंतर्गत रस्ता कॉक्रीटीकरण
करणे, मौजे कळंबे येथे स्मशानभुमी रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे,मौजे किडगांव येथे अंतर्गत रस्ताकॉक्रीटीकरण
करणे.कराड तालुक्यातील सुर्ली येथे सामाजिक सभागृहबांधणे, इंदोली येथे अंतर्गत रस्ते कॉक्रिटीकरण व बंदीस्त गटरबांधणे, कोर्टी येथे श्री सिध्देश्वर ग्रंथालय व वाचनालयाची इमारतबांधणे, वडगांव येथे सभामंडप बांधणे,गोटे येथे अंतर्गतरस्ता कॉक्रिटी करण करणे,वनवासमाची खोडशी अंतर्गत रस्ता कॉक्रिटी करण करणे,मनव येथे अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरणकरणे, हिंगनोळे येथे अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण करणे, तळबीड अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण करणे,मौजे मसुर येथील अंतर्गत रस्ता कॉक्रीटी करण करणे.
खटाव तालुक्यातील फडतरवाडी-बुध येथील अंतर्गत रस्तेकाँक्रिटी करण करणे, दरुज खटाव रोड ते लावंगरा रस्ताखडीकरण डांबरीकरण करणे, वडगांव (ज.स्वा.) येथे सभा मंडपबांधणे, पुसेगांव येथे अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण करणे,याशिवाय जावली तालुक्यातील आखाडे एसटी स्टॅन्ड ते गावठाण रस्ता डांबरीकरण करणे, खंडाळा तालुक्यातील भादेयेथे सभामंडप बांधणे, फलटण तालुक्यातील विंचुर्णी येथील अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण करणे, पाटण तालुक्यातीलशिंगणवाडी येथे संरक्षक भिंत बांधणे, इत्यादी कामांचा समावेश आहे. सदरची कामे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात येणार आहेत.