Monday, April 20, 2026
spot_img
Home Maharashtra हॉस्पिटलमध्येही आमदार गोरे यांनी पाहिली पंतप्रधान मोदींची मनकी बात

हॉस्पिटलमध्येही आमदार गोरे यांनी पाहिली पंतप्रधान मोदींची मनकी बात

661
Adv

भारतीय जनता पार्टीचे सातारा जिल्ह्याचे अध्यक्ष आ. श्री. जयकुमार गोरे यांचा भीषण अपघात काल झाला. या परिस्थितीत सुद्धा आज हॉस्पिटल मधून देशाचे लोकप्रिय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी जी यांच्या “मन की बात” कार्यक्रम पाहिला.

आमदार साहेबांची गाडी ४०-५० फूट उंचीवरून ३-४ पलटी घेत खोल बानगंगा नदीत पडली. संपूर्ण महाराष्ट्रात ही थरकाप उडवणारी घटना होती. पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक मध्ये आय. सी. यू. मध्ये दाखल करत उपचार सुरू झाले. दिवसभर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे कॉल, अनेक मंत्री आणि आमदार हे भाऊंची प्रकृती पाहायला आले, असंख्य कार्यकर्ते हॉस्पिटलला आलेले. आमदारांची भेट होणे ही अवघड होते. शरीरावर अनेक ठिकाणी मार लागलेला असताना आज २८ तासात आमदार साहेब मोदींचा ” मन की बात” कार्यक्रम पूर्णवेळ पाहतात. हे पाहून भाजपा कार्यकर्त्यांना वेगळी ऊर्जा मिळाल्या शिवाय राहणार नाही. यावेळी खा.श्री. छ उदयनराजे भोसले .खा. श्री. रणजितसिंह नाईक निंबाळकर, उपस्थित होते.

Adv