सहकारी संस्था मोडकळीस आणणाऱ्यांना जिल्हा बँकेपासून दूर ठेवा खा उदयनराजे

326
Adv

सातारा जिल्हयातील निर्णय जिल्हयातच झाले पाहीजेतृ बैठक कुठंतरी बोलावली आहे.बास्तबिक जे मतदार तुम्हाला मत देणार आहेत, आजपर्यंत मत देत आले आहेत, त्यांची मतेमतांतरे अजमावण्यासाठी बार्षिक सर्वसाधारण सभेसारखी बैठक बोलबली असती तर ते संयुक्तिक ठरले असते.,अशी मार्मिक परंतु खोचक प्रतिक्रीया आज खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी प्रसारमाध्यमांना देताना, ज्यांनी सहकारी संस्था मोडकळीस आणल्या, संस्थांचे खाजगीकरण
केले, अश्या व्यक्तींना जिल्हा बॅन्केच्या मतदारांनीच बॅन्के पासून दूर ठेवणे गरजेचे आहे असा घणाघाती टोला लगावला आहे.
सातारा नगरपरिषदेच्या विविध विकास कामांच्या भुमीपूजन आणि लोकार्पण कार्यक्रमांत पत्रकारांशी वार्तालाप करताना पत्रकारांनी विचालेल्या प्रश्नाला उत्तर देताना खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी जिल्हयाचा निर्णय जिल्यातच करा, असा अप्रत्यक्ष फटकार लगावला आहे.

माझी इतकी मत आहेत,तितकी मतं आहे असा मी, मीपणा, मीच पाहीजे, हा अहंकार या अहंकारामुळे जे मतदार आहेत त्या मतदारांना गृहीत धरून हे मताचे राजकारण करीत आहेत. सातारा डिसीसी पहिल्यापासून एक चांगली बॅन्क आहे, लोकहिताचे काम चांगले चाललेले आहे.अश्या बॅन्केला गालबोट लागता कामा नये. कोण संचालक असावे हा विषय आहे. जे नको असतील तर नको, त्याकरीता अट्टाहास नाही.की.दुस-यांनाही संधी मिळावी म्हणून अट्टाहास नसावा.किरकोळ कारणा करीता डिसीसी मतदारांचा मतदानाचा हक्कच अवैध ठरवण्यात आला. मग वकील देवून त्या मतदारांची कायदेशीर बाजुमांडली गेल्याने, या मतदारांचा मतदानाचा हक्क अबाधित राहीला. मत कोणाला दयायचे हा मतदारांचा सार्वभौम अधिकार आहे. मतदान हयालाच करा, त्यालाच करा असं बंधन आवश्यक नाही ज्यावेळी नको ती लोकं निवडुन बॅन्केत जातात,त्या वेळे स सहकारी संस्था मोडकळीस आल्या,काही संस्था लिक्वीडेशन मध्ये गेल्या,खाजगीकरण झाले.काही जिल्हयातील जिल्हा मध्यवर्ती बॅंक सध्दा दिवाळखोरीत गेल्याची उदाहरणे आहेत. ज्यांनी सहकारी संस्था स्थापन केल्या ज्यांनी त्या संस्था मोडकळीस आणल्या,खाजगीकरण केले,त्या लोकांना बॅन्केच्या ब शेतकरी सभासदांच्या लोकहितासाठी बॅन्केपासून दूर ठेवणे आणिजिल्हयाचे निर्णय जिल्हयातील व्यक्तींनी सार्वमत अजमावून घेणे आजच्या घडीला गरजेचे आहे असे शेतकरी सभासदांच्या वतीने आम्हाला वाटते, परंतु आमचे म्हणणे पचवता येणारे नसल्याने, पटणार नाही असे देखिल खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी बोलताना सांगीतले.दरम्यान, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या या आक्रमक शब्द फेकीच्या आज जिल्हा मध्यवर्ती बॅन्केच्या सभासदांमध्ये दिवसभर चर्चा झडल्याने संपूर्ण जिल्हा ढवळून निघाला.

Adv