रा. ना. गोडबोले सार्वजनिक ट्रस्ट व सातारकर नागरिक यांच्यातर्फे प्रतिवर्षी दिला जाणारा मानाचा सातारा भूषण पुरस्कार 2019 सालासाठी गेली 25 वर्षे आयटी सिक्युरिटी क्षेत्रात आपल्या क्विक हील या देश परदेशात नामांकित असलेल्या कंपनी द्वारे करोडो नागरिक व कंपन्यांना अत्त्युत्तम सेवा देणार्या संस्थेचे संस्थापक डॉ कैलाश व डॉ संजय काटकर या बंधुना जाहीर करण्यात आला होताहा पुरस्कार समारंभ सोमवार दि. 16 डिसेबंर रोजी सायंकाळी 6 वाजता यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्युट ऑफ सायर्नंसच्या सभागृहात रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील व परिणादायी लोकिप्रिय वक्ते पघि.नितीन बानुगडे पाटील यांचे अध्यक्षतेखाली आयोजीत केला आहे, या समारंभातस सर्व सातारकर उद्योजक व नागरिक बंधू भगिनिनी या कर्तृत्व गौरव समारंभास अगत्य उपसिथ्त रहावे असे आवाहन गोडबोले ट्रस्टचे अध्यक्ष अरुण गोडबोले यांंनी केले आहे..
सातारा जिल्ह्याच्या खटाव तालुक्यातील ललगुण या छोट्या गावातील आणि रहिमतपूरला जन्मलेले शेतकरी कुटुंबातील हे दोघे सुपुत्र. यातील ज्येष्ठ कैलाश यांनी पुण्यात शालेय शिक्षण घेतानाच जिद्दीने स्वताचे छोटे इलेक्ट्रिक वर्क्शोप सुरु केली. तीव्र बुद्धी, उर्जा, व् चिकाटी या गुणांच्या बळावर त्यांना असलेल्या नाविन्याच्या ओढीने नवीन आय टी सिक्युरिटी क्षेत्रात पदार्पण करण्यास उद्युख केले.. याच दरम्यान आपले संगणक क्षेत्रातील पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून धाकटे बंधू डॉ संजय त्यांना जॉईन झाले .
अफाट जिद्दीने त्यांनी आपले प्रोडक्ट तयार करून 1995 साली त्याच्या मार्केटिंग ला प्रारंभ केला.सर्वोच्च दर्जा, उत्तम ,स्नेहपूर्ण आणि त्वरित सेवा ही त्रिसूत्री सदैव जप्त गेल्याने ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत गेला.तेव्हापासून आजतागायत कंपनीची घोडदौड वेगाने चालू आहे. आज आपला उत्तम कार्यशैलीचा 1200 हून जास्त स्टाफ, भारतातभर पसरलेल्या अनेक शाखा ,शिवाय अमेरिका , दुबई,जपान , आफ्रिका या देशातील शाखा व तद्न्य अभियंते यांच्या माध्यमातून क्विक हील टेक्नोलोजी अक्षरशः कोटयवधी ग्राहकांची आणि म्मोथ मोठ्या कंपन्यांची तत्पर सेवा करीत आहे.. सतत नवनवीन संशोधन करून अद्ययावत उत्पादने निर्माण करून जागतिक स्पर्धेला सक्षम तोंड देत कंपनीने आपले अग्रस्थान जागतिक पातळीवरही कायम राखले आहे.
या दोन्हो बंधूंना या त्यांच्या कार्याबद्दल अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले गेले असून शिवाय दोघांनाही दोन विद्यापीठांनी मानद विद्या वाचस्पती नेही गौरविले आहे,
आपल्यापैकी हजारो लोक क्विक हील रोज वापरतात पण त्याचे जनक आपल्या सातारा जिल्ह्यातीलच हे दोघे काटकर बंधू आहेत हे आपणास माहितही नसते.त्यांची ही जिद्द, उद्यम शिलता तरुणांना व नव उद्यामिना निश्चित प्रेरणादायी ठरणारी आहे.
गोडबोले ट्रस्ट तर्फे 1991 पासून प्रतिवर्षी ज्ञान, विज्ञान, उद्योग,कला ,क्रीडा, समाजकार्य अशा कोणत्याही क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणार्या सातारा जिल्ह्याच्या सुपुत्रास सातारा भूषण पुरस्काराने गौरविले जाते. हे पुरस्काराचे 29 वे वर्ष असून यापूर्वी छोटा गंधर्व, तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी, प्रा. शिवाजीराव भोसले, शाहीर साबळे , धावपटू ललिता बाबर , डॉ नरेंद्र दाभोलकर, प्रताप गंगावणे , रयत शिक्षण संस्था अशा मान्यवरांना गौरविण्यात आले आहे.
यावर्षी ज्येष्ठ संशोधक डॉ दत्तप्रसाद दाभोलकर,पत्रकार विजय मांडकेआणि ट्रस्ट चे विश्वस्त अशोक, डॉ अच्युत व उदयन गोडबोले यांच्या निवड समितीने हि निवड केली आहे. रु. 30 हजार व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असून ज्येष्ठ कलाकार प.ना. पोतदार व रविंद्र झुटींग यांनी अतिशय कलात्मक अशीही दोन्ही सन्मान पत्रे तयार केली आहेत.