जिल्ह्याच्या प्रश्नावर खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले हे नेहमीच अग्रेसर असतात आज पुण्यात झालेल्या मीटिंगमध्ये ही जिल्ह्याच्या विकासासाठी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आग्रही भूमिका मांडून रेल्वे संदर्भातील विविध प्रश्न मांडून जिथे जिथे रेल्वे फाटक आहेत तिथे तिथे मोठे पूल होणार असून यामुळे त्या त्या तालुक्यातील वाहतुकीचा भविष्याचा प्रश्न मिटणार आहे
या बैठकीस खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यासह रेल्वे बोर्डाचे अधिकारी बाजार समितीचे माजी संचालक काकासाहेब धुमाळ माजी शिक्षण सभापती सुनील काटकर जितेंद्र खानविलकर नगरसेवक दत्तात्रय बनकर युवा नेते संग्राम बर्गे आदी मान्यवर उपस्थित होते
या बैठकीमध्ये सातारा पुणे लोकल चालू व्हावी तसेच जिल्ह्यातील सर्व रेल्वे स्टेशन हे सुसज्ज व दिमाखदार करण्यात यावेत तसेच रेल्वेरूळामुळे कोणत्याही शेतकऱ्याचे नुकसान होता कामा नये अशी भूमिका ही खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी यावेळी घेतली व प्रलंबित असलेल्या रेल्वेच्या कामाचा आढावाही या बैठकीत घेण्यात आला
खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या पुणे येथे आज झालेल्या बैठकीमध्ये देऊर ,वाठार स्टेशन, तांदुळवाडी आधी ठिकाणी रेल्वे फाटक आहेत तिथे मोठे ब्रिज पुल होणार असून या विविध भागांचा भविष्याचा वाहतुकीचा प्रश्न मार्गी लागणार आहे