: दि.२३ फेब्रुवारी रोजी सुपारी देवून माझ्यावर कोयत्यासारख्या घातक शस्त्राने हल्ला करणार्या राजू अनिल भोसले, संतोष अनिल भोसले यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे, अशी माहिती पुनवडी (ता.सातारा) येथील सुधीर देसाई यांनी सातारा येथील झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले, पुनवडी (ता.सातारा) येथे सुरू असलेल्या बेकायदेशीर स्टोन क्रेशर बाबत वारंवार निवेदने, तक्रारी अर्ज देवूनही संबंधितांवर कोणतीही कारवाई होत नसल्याने भोसले बंधू यांनी सुपारी देवून माझ्यावर दि.२३ फेब्रुवारी रोजी दुपारी 1 वाजता सातारा येथील राजवाडा परिसरात कोयत्याने हल्ला केला होता. याबाबत आपण संबंधित पोलिस स्टेशनला तक्रार करूनही भोसले बंधूवर कारवाई झाली नाही. याबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता.
निव्वळ दिशाभूल करणारी माहिती मला दिली जात आहे. माझ्यावर हल्ला करणार्या राजू व संतोष अनिल भोसले या दोन आरोपींना तात्काळ अटक करावी, अन्यथा संबंधित पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करू शकतात, असे सांगून त्यांच्यापासून माझ्या व माझ्या कुटुंबातील व्यक्तींच्या जीवितास धोका निर्माण होवू शकतो त्यामुळे अजयकुमार बन्सल यांनी संबंधित आरोपींना अटक करण्याचा आदेश द्यावा अशी मागणी सुधीर देसाई यांनी यावेळी केली.