राजे गणीम ओळखाच

67
Adv

नुकत्याच पार पडलेल्या सातारा लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा पराभव सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागला असून राजेंनी आतातरी गणिम ओळखावा अशी मागणी सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी कडून होत आहे

लोकसभेला झालेला पराभव याची नेमकी कारणे काय हे त्या काही दिवसातच स्पष्ट होईल तत्पूर्वी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना राजें पर्यंत करून पोचवले जात नाही अशी चर्चा दिवसभर साताऱ्यात काल पाहिला मिळाली वाढलेल्या मताधिक्यचा फायदा नक्की कोणाला झाला हेही येथे काही दिवसात स्पष्ट होईल अहोरात्र काम करूनही निराशा का आली कोणामुळे आली याचं आत्मपरीक्षण नक्की कोणी केले पाहिजे हे सर्व पाहिले तरच गनिम ओळखता येईल अशी भावना ही सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी बोलून दाखवली

जिल्ह्यातून मतांची आकडेवारी बूथ निहाय जाहीर होईलच तेव्हा कळेल कोणी काम केले आणि कोणी केले नाही तत्पूर्वी सातारा शहरात राजेंची एक हाती सत्ता असताना किती नगरसेवकांनी काम केले
हेही पहाणे गरजेचे आहे दहा वर्ष विविध माध्यमातून राजनी कार्यकर्त्यांना बळ दिले त्या कार्यकर्त्यांनी किती परिश्रम केले याचा सारासार विचारही राजनी केला पाहिजे स्वतःवर वेळ आली की त्यांना राजे दिसतात राजें वेळ आली ती त्यांना कोणत्या स्वरूपात लक्ष्मी दिसते याचे कोडे मात्र कोणालाही उलगडणार नाही अशी परिस्थिती दिसत आहे राजेंनी स्वतःचा दबदबा जिल्ह्यात निर्माण केला नसता जिल्ह्यातील उच्चपदांवर राजेंचा कार्यकर्ता दिसला नसता हे हेही त्रिकाल सत्य आहे राजे पुन्हा एकदा सांगतो राजे मरगळ झटका आणि नक्कीच गणीम ओळखा तर सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय मिळेल

Adv