पुसेगाव यात्रेनिमित्त उद्याच बैलगाड्या शर्यत होणार असल्याची माहिती श्री सेवागिरी महाराज देवस्थान ट्रस्टच्या वतीने देण्यात आली आहे
श्री सेवागिरी महाराज देवस्थान ट्रस्टची यात्रा सुरू असून काही अपहर्य कारणांमुळे बैलगाडा शर्यत पुढे ढकलण्यात आली होती मात्र आता उद्या मंगळवारी बैलगाडा शर्यतीला परवानगी मिळाली असल्याने ही शर्यत उद्याच होणार असल्याची माहिती श्री सेवागिरी महाराज देवस्थान ट्रस्ट पुसेगाव यांच्या वतीने देण्यात आली आहे
श्री सेवागिरी महाराज देवस्थान ट्रस्टच्या वतीने दरवर्षी बैलगाडा शर्यत घेण्यात येते महाराष्ट्रातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत म्हणून या शर्यतीकडे बघितले जाते उद्या होणाऱ्या शर्यतीकडे महाराष्ट्रातून बैलगाडा मालक या शर्यतीत सहभागी होणार आहे