Monday, April 20, 2026
spot_img
Home Satara District पूरग्रस्तांच्या मदतीसाठी केंद्राकडे पाठपुरावा सुरू छ.उदयनराजे जिल्हा प्रशासनाला दिल्या कानपिचक्या

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी केंद्राकडे पाठपुरावा सुरू छ.उदयनराजे जिल्हा प्रशासनाला दिल्या कानपिचक्या

614
Adv

धीर सोडु नका, केंद्र आणि राज्य सरकार, जिल्हा आपत्ती व्यवस्थापनातील सर्व घटक, एनजीओज्, आणि आम्ही सर्वजण तुमच्या बरोबर आहोत. वित्तहानी कितीही झाली तरी आज ना उद्या ती भरुन काढता येईल अश्या भक्कम आधार देणा-या भावना व्यक्त करतानाच खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी मदत कार्य वेगाने सुरु करावे,मदत कार्य करताना जनतेला कमीतकमी त्रास होईल याची दक्षता घ्यावी अन्यथा पुरग्रस्त जनतेचे श्राप-अश्राप भोगावे लागतील असा इशारा प्रशासनाला दिला आहे. खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले हे संसदेच्या अधिवेशनाच्या निमित्ताने दिल्ली येथे आहेत. तरी देखिल त्यांचे लक्ष पूरपरिस्थितीच्या पार्श्वभुमीवर पूर्णपणे महाराष्ट्र आणि विशेष करुन कोकण आणि पश्चित महाराष्टाकडे आहे. या भागातील पूरस्थितीची आणि भौगोलिक परिस्थितीची माहीती त्यांनी केंद्रीय गृहमंत्रालय आणि मदत मंत्रालयाला दिली असून,केंद्राकडून भरीव मदत मिळण्यासाठी त्यांनी पाठपुरावा सुरु केला आहे.

पूरबाधिक जिल्हयातील पुरबाधिक आणि अतिवृष्टीबाधित कुटुंबियांना भक्कम आधार देण्यासाठी आवश्यक ते सर्व मदत कार्य पोहोचल पाहीजे यासाठी ते दक्षता घेत आहेत.या पार्श्वभुमीवर श्री छ उदयनराजे भोसले यांनी दिल्लीतुन प्रसारमाध्यमांना दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात नमुद करण्यात आले आहे की,महाराष्ट्रात विशेष करुन कोकण,सातारा,कोल्हापूर, सांगली या जिल्हयांमध्ये ढगफुटी सारख्या सतत कोसळणा-या पावसामुळे विविध कारणांने अनेकांचे संसार उघडयावर आले
आहेत. पूर येणे, दरडी कोसळणे, पुराच्या पाण्यात सर्वकाही बाहुन जाणे, रस्त्यांवर पाणी साचुन बाहतुक विस्कळीत होणे,अश्या अनेक घटना घडल्या आहेत. वित्त हानी प्रचंड प्रमाणात झाली आहे. काही ठिकाणी जीवित हानी देखिल झाली आहे. सरकारने मारले आणि आभाळ फाटले तर दाद कुठे मागायची असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.

निसर्गाच्या आणि भोंगळकारभाराचे असे अनेक फटके दुर्दैवाने गेल्या काही वर्षात काही अंतराने जरा जास्तच बसु लागले आहेत. त्यातच गेल्या सुमारे दिड वर्षापासून असलेल्या का नसलेल्या कोरोनाने जनता त्रासुन गेली आहे.गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाने जनजीबन पूर्णपणे विस्कटले आहे. संपूर्ण यंत्रणा कोलमडुन गेली आहे.परंतु कोणीही खचुन जावू नका,निसर्गाने संकटे दिली तरी त्यातुन मार्ग काढण्याची जिद्द आणि विवेक देखिल निसर्गच देत असतो. सर सलामत तो पगडी पचास या उक्तीप्रमाणे आपले आणि आपल्या कुटुंबाचे बहुमूल्य जीवन महत्वाचे आहे म्हणून सावधानता बाळगुन संयम ठेवा. संसार पुन्हा उभा करता येईल,त्यासाठी आम्ही स्वतः तातडीने शक्य ते सर्वप्रकारचे मदतकार्य सुरु करीत आहोत. राज्य सरकारच्या पाठीशी केंद्रसरकार आहे. विविध अशासकीय संस्था मदतकार्यासाठी पुढे आल्या आहेत. पूर येवून गेल्या ठिकाणी रोगराई पसरु नये
म्हणून आम्ही स्वच्छता दूतांचा समावेश असलेली पथके तयार केली आहेत. आर्थिक, बस्तुरुपातील सहायाबरोबरच श्रम सहायय देखिल पुरविण्याचा आराखडा आम्ही हाती घेतला आहे. शासनकार्यवाहीला पूरक ठरेल असे कार्य हाती घेण्यात आले आहे. कोणत्याही परिस्थितीत पूरस्थितीत सापडलेल्यांना आधार देण्याचे काम केले जाईल.निसर्गातील पाण्याला पुरेशी वाट ळाली नाही तर आजुबाजुला पूरपरिस्थिती नर्माण होते.तर मग आपल्या कार्यक्षेत्रातील नदया,नाले,ओहोळ हे अरुंद झाले आहेत काय याची शोध मोहिम प्रशासनाने हाती घेणे आवश्यक आहे. गेल्या काही दशकातील पर्जन्यमान आणि अलिकडच्या काळातील पर्जन्यमान याचा विचार करता, पाउस पूर्वीपेक्षा कमी-कमी होत आहे. असे असताना अश्या वारंवार घडणा-या घटनांमधुन आपण बोध घेणार आहोत की नाही हा खरा प्रश्न आहे.

Adv