छत्रपती उदयनराजे यांनी केले हैदराबाद पोलिसांचे अभिनंदन

47
Adv

भाजपा नेते माजी खासदार श्री छ.उदयनराजेंनी केलेल्या आपल्या अधिकृत ट्विटमध्ये त्यांनी तेलंगण पोलिसांचे अभिनंदन केलं आहे हैदराबाद बलात्कार प्रकरणात ताब्यात घेण्यात आलेले ४ आरोपी पळून जाण्याच्या प्रयत्नांत असताना पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये मारले गेले तेलंगणा पोलिस दलाचे मनःपूर्वक अभिनंदन असं छ उदयनराजेंनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे

      हैदराबाद सामुहिक बलात्कार प्रकरणातील चारही संक्षयित आरोपींना पोलिसांनी ठार केले आहे. गुन्हा घडल्याच्या ठिकाणी चौकशीसाठी नेले असता या चारही जणांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला.

या वेळी झालेल्या चकमकीमध्ये या चौघांना ठार करण्यात आल्याची माहिती तेलंगण पोलिसांनी दिली आहे अनेकांनी या एन्काउंटरप्रकरणी पोलिसांचे अभिनंदन केले असून काहींनी या एन्काउंटरबद्दल संक्षय व्यक्त केला आहे. ही बातमी समोर आल्यानंतर छ.उदयनराजे भोसले यांनीही हैदराबाद पोलिसांचे अभिनंदन ट्विट केले आहे.

Adv