भूमीपूजनावेळी मोदींनी शिवछत्रपतींचा व मावळ्यांचा केलेला उल्लेख हा महाराष्ट्राचा सन्मान : उदयनराजे

37
Adv

करोडो हिंदूंसह भारतीयांचे अनेक शतकांचे असलेले स्वप्न आता पूर्ण होत आहे. मागील वर्षाच्या अखेर राम जन्मभूमीबाबत निकाल लागल्या नंतर २ दिवसांपूर्वी ५ ऑगस्टला राम मंदिराच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला. कोरोनाचे सावट लक्षात घेता मोजक्याच निमंत्रितांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडला असला तरी जगभरातील रामभक्तांनी हा सोहळा असेल त्या ठिकाणाहून बघत या ऐतिहासिक क्षणाचा अनुभव घेतला. तर, यावेळी महाराष्ट्रवासीयांसाठी व शिवभक्तांसाठी एक अभिमानास्पद असे उद्गार पंतप्रधान मोदींनी काढले.

यावेळी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, ‘श्रीराम मंदिर निर्माण कार्याचे उदाहरण इतिहासातील घटनांच्या आधारे स्पष्ट केले. “जसे खारी पासून ते वानर आणि आदिवासी असे सर्वांनाच रामाच्या विजयाचे साधन बनता आले, जसे श्री कृष्णाला गोवर्धन पर्वत उचलण्यास छोट्या छोट्या गावळींना मोठी भूमिका निभावली, ज्या प्रकारे मावळे छत्रपती वीर शिवाजी महाराजांच्या स्वराज्य निर्माणाचे शिल्पकार बनले, तसेच महाराजा सोहेलदेवांपासून ते स्वातंत्र्यासाठी गांधींना सर्वच वर्गातील देशभक्तांनी साथ दिली तशीच देशभरातील लोकांच्या मदतीने राम मंदिर निर्माणाचे कार्य सुरु झाले आहे

त्यामुळे, या ऐतिहासिक सोहळ्यावेळी पंतप्रधान मोदींनी केलेला शिवछत्रपतीचा उल्लेख हा महाराष्ट्राचा सन्मान व गौरव असल्याच्या भावना खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी ट्विटरद्वारे व्यक्त केल्या आहेत. त्यांनी,प्रभू श्रीराम जन्मभूमी भव्य मंदिर भूमिपूजन ऐतिहासिक दिवशी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी शिवछत्रपतींचा व मावळ्यांचा केलेला उल्लेख तमाम देशवासियांसमोर केलेला आपल्या महाराष्ट्राचा सन्मान व गौरव आहे.’ असे ट्विट भाजपचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केले आहे.

Adv