माढा लोकसभा मतदारसंघात सन्नाटा क्यू है भाई

433
Adv

माढा लोकसभा मतदारसंघाच्या पार्श्वभूमीवर उमेदवार बदलावा यासाठी फलटणचे नाईक निंबाळकर अकलूजचे मोहिते पाटील यांनी महायुतीचा उमेदवार बदलावा यासाठी जंग जंग पछाडले मात्र आता या फलटणकर व अकलूजकरांच्या तलवारी म्यान झाल्या का ?असा प्रश्न सातारा जिल्ह्यासह माढा मतदारसंघाला पडला आहे

विद्यमान खा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना महायुतीने उमेदवारी दिली तुला उमेदवारी मिळून देणार नाही अशी रामगर्जना फलटणच्या मेळाव्यात झाली होती महाराज साहेब भले चपली ने मारा पण आम्ही काम करणार नाही अशी स्पष्ट वक्तव्य फलटणच्या मेळाव्यात कार्यकर्त्यांनी केलेली असताना गेल्या दहा दिवसापासून माढा मतदारसंघात राजकीय सन्नाटा असल्याचे दिसून येते या सनाट्याची सुई फलटण व अकलूज करांच्या वाड्याकडे दिसून येते

माजी जिल्हा परिषद अध्यक्ष, सदस्यांसह जिल्हा परिषदेचे विविध मान्यवरांनी रणजीत निंबाळकर यांच्या उमेदवारीला विरोध करणारे आता कुठे गेले का नुसतीच कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवून स्वतःची राजकीय महत्वकांक्षा वाढवली अशी चर्चा खाजगीत रंगू लागली आहे पण सर्वसामान्यांचा विश्वास फलटण व अकलूजकरांच्या वाड्यावर असून या माढा मतदारसंघातील मतदारांना अजून किती दिवस वाट बघावी लागणार हे आता कोडेच बनले आहे

Adv