लोणंद – आदर्की फाटा रस्ता मजबुती करणासाठी 12 कोटी 89 लाखाचा निधी मंजूर खा उदयनराजे यांची माहिती

427
Adv

एनएच 965D या राष्ट्रीय महामार्गावरील लांणंद ते आदर्की फाटा या भागातील रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी दोन्नतीकरीता खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय सड़क परिवहन मंत्री ना.नितिन गडकरी यांना या रस्त्यास मंजूरी देणेबाबत नुकतीच विनंती केली होती. त्यानुसार दिल्ली येथील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने लोणंद ते आदर्की फाटा अखेर
रस्त्याच्या बळकटीकरणासाठी/12 कोटी 89 लाख 61 हजार 423रुपयांच्या अंदाजपत्रकीय कामास कालच मंजूरी दिली आहे अशी माहीती जलमंदिर पॅलेस,येथुन दिलेल्या प्रसिध्दीपत्रकाव्दारे देण्यात आली आहे.

याबाबत खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे जनसंपर्क कार्यालया, जलमंदिर पॅलेस येथुन जारी करण्यात
आलेल्या प्रसिध्दीपत्रकात पुढे नमुद केले आहे की, सातारा जिल्हयातील लोणंद हे ग्राणिम आणि शहरी लोकसंख्येचा मिलाफ असलेले शहर पूर्वीपासून व्यापारी केंद्र म्हणून ओळखले जाते, लोणंदवासियांना,नोकरी-व्यवसाय,व्यापार उदिम,शिक्षण, इत्यादी अनेक कामासाठी सातारा या जिल्हयाच्या ठिकाणी यावे-जावे लागत असते. तसेच लोणंदच्या कांदा बाजारपेठ व अन्य कारणाकरीता, सातारवासिय देखिल लोणंद येथे सातत्याने जात येत असतात. या रस्त्यावरील दैनंदिन वाढती रहदारी तसेच पुणे सातारा या राष्ट्रीय महामार्गाला पर्याय म्हणून या रस्त्यावरुन दक्षिणेकडे जाणारी जड-वाहतुक विचारात घेवून, या रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी आणि हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्रोधिकरणाच्या अखत्यारित आल्याने, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी या रस्त्याच्या रंदीकरण, मजबुतीकरण, दोन्नतीसाठी विशेष विनंती ना.नितिन गडकरी यांचेकडे वारंवार केली होती.

त्यानुसार पहिल्या टप्यातील आदर्की फाटा ते सातारा या रस्त्याचे काम काही दिवसापूर्वीच पूर्ण करण्यात आले होते. तथापि आदर्की फाटा ते लोणंद अखेर रस्त्याच्या भागाचे मजबुतीकरण प्रलंबीत होते. याकरीता खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी नुकतीच ना.नितिन गडकरी यांची भेट घेतली होती. त्यावेळी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आदर्की ते फलटण या रस्त्याच्या दोन्नती/बळकटी करणासाठी तातडीने मंजूरी दयावी अशी मागणी केली होती. त्यानुसार ना.नितिन गडकरी यांनी राष्ट्रीय प्राधिकरणाला सूचना दिल्या होत्या आणि म्हणूनच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने एनएच 956D या रस्त्याच्या लोणंद ते आदर्की फाटा या एकूण 17.145 किलोमिटरचे दोन्नतीचे कामास सुमारे 13 कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकास मंजूरी प्रदान केली असून, सदरचे काम राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मार्गी लावण्याच्या सूचना केल्या आहेत. लोणंद ते सातारा या रस्त्याच्या चौपदरीकरणाचा प्रस्ताव खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सूचवला असून, भविष्यात सदरचा प्रस्ताव देखिल मंजूर होवून, गतीमान दळणवळण व्यवस्था अस्तित्वात येईल असेही प्रसिध्दीपत्रकात नमुद करण्यात आले आहे. दरम्यान, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आणि केंद्रीय मंत्री ना.नितिन गडकरी यांचे असलेले घनिष्ठ
जिव्हाळयाचे संबंध लक्षात घेता या दोघांमुळे आदर्की फाटा ते लोणंद अखेरच्या सुमारे 13 कोटींच्या कामासमंजूरी मिळाल्याने,
लोणंदकर आणि सातारा जिल्हावासियांनी समाधान व्यक्त करत अभिनंदन केले आहे

Adv