सातारच्या कंदी पेढेयास जीआय मार्क मिळवण्यासाठी प्रयत्न करणार उदयनराजे

46
Adv

मराठा साम्राज्याची राजधानी असलेली सातारा ची भुमी ऐतिहासिक भूमी म्हणून ओळखली जाते महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला चांगली दिशा देण्याचे काम साताराच्या बुद्धिमत्तेने केले असून शूरवीर आजी माजी सैनिकांचा आणि क्रांतिकारकांचा जिल्हा म्हणून सातारची जगात ओळख असली तरी सातारी कंदी पेढे यामुळेही सातारा जिल्ह्याची जगात वेगळी ओळख आहे ही ओळख अधिकाधिक ठळक करण्यासाठीही सातारा जिल्ह्यातील कंदी पेढे व्यवसायिकांची संस्था स्थापन करून कंदी पेढायाचा जीआय मार्क मिळवण्यासाठी लागेल ते सहकार्य राहील असे उद्गार खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी काढले

जगाच्या पाठीवर सातारी कंदी पेढे ओळख अधिकाधिक ठळक करण्यासाठी कंदी पेढे उत्पादकांचे एकीकरण करून सामूहिक रित्या कंदी पेढे यांना जॉग्रफिकल आयडेंटिफिकेशन मिळवण्यात येणार आहे सातारी कंदी पेढ्यांची जगामध्ये ओळख पण त्याला कायदेशीर मान दिला गेला पाहिजे त्यासाठी पेढे उत्पादकांची संस्था नोंदणी करून विशेष प्रयत्न केले जातील असेही याप्रसंगी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे यांनी सांगितले

जलमंदिर पॅलेस येथे सातारा प्रसिद्ध कंदी पेढे व्यवसायिकांची सोशल डिस्टंसिंग पळून विशेष बैठक झाली त्यावेळी मार्गदर्शन करताना श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सांगितले की महाराष्ट्रात कंदी पेढे सर्वत्र मिळत असले तरी सातारचा कंदी पेढड्याची वेगळी चव आणि ओळख आज सातासमुद्रापलीकडे ओळख पोचली आहे सातारी कंदी पेढे तयार करण्याची परंपरा पद्धत अत्यंत चांगली आणि हायजेनिक आहे सध्या अत्याधुनिक यंत्रसामुग्री मुळे परंपरागत पद्धत अगदी काही मोजक्या ठिकाणी पाहायला मिळतात इतर कंदी पेढे आणि सातारचे कंदी पेढे यांची पद्धत थोडी वेगळी आहे

या कामी संग्राम बर्गे यांनी विशेष पुढाकार घेतला असून या बैठकीस उपस्थित पेढे व्यवसायिक यांचे स्वागत केले यावेळी माजी शिक्षण मंडळाचे सभापती वसंत शेठ जोशी योगेश मोदी अर्जुन मोदी कन्हैयालाल राजपुरोहित प्रशांत मोदी महेश निकम विशाल मोदी बहुसंख्य कंदी पेढे व्यवसायिक उपस्थित होते

Adv