पाचगणी येथील बेकायदेशीर कामाची थेट मुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार

506
{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"addons":1,"transform":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}
Adv

पाचगणी येथील बेकायदेशीर कामाची पुरोहित यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तक्रार केली असून मुख्याधिकारी निखिल जाधव फारशा तक्रारी गांभीर्याने घेत नसल्याचे ही येथील नागरिकांचे म्हणे आहे

मेहुल पुरोहित त्यांच्या घराशेजारी एक बेकायदेशीर बांधकाम चालू असून याचे संबंधित फोटो व्हिडिओ याची तक्रार मुख्याधिकारी यांच्याकडे केली होती मात्र कारवाई न झाल्याने पुरोहित यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ऑनलाईन तक्रार केल्याने पालिकेच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे जिल्हाधिकारी डुडी यांचे लाडके मुख्याधिकारी म्हणून निखिल जाधव यांची ओळख सातारा जिल्ह्याला सुप्रचित आहे मुख्याधिकाऱ्यांच्या कामकाजावर येथील नागरिक प्रचंड नाराज असून हे बेकायदेशीर काम थांबले नाहीत तर येणाऱ्या काळात पालिकेसमोर आंदोलन करण्याचा इशारा पुरोहित कुटुंबांनी दिला आहे

रविवारच्या सुट्टी मध्ये लोड बेरिंग च्या साह्याने मोठे मोठे लोखंडी अँगल च्या साह्याने स्लॅब टाकून पहिल्या मजल्याची तयारी केली आहे व सदर इसम पुढेही बांधकाम चालू ठेवेल आपणास 26 एप्रिल रोजी तक्रार अर्ज करून सुद्धा आपण त्यांना कुठल्याही प्रकारची नोटीस किंवा तंबी दिली नाही त्याहून ते काम चालू आहे व ते त्वरित काम बंद करून बेकायदेशीर बांधकाम काढून घ्यावे ही विनंती
त्या बांधकामामुळे आमच्या राहण्यावर त्रास होत आहे आमचे हवा उजेड बंद झाले आहे आमचे तिकडे घर सुद्धा आहे व 45 वर्षे जुना रेस्टॉरंट बिझनेस आहे तिकडे आमचे किचन आहे जर का ते बांधकाम काढलं नाही तर आमच्या किचनचा धूर कुठे जाऊ शकत नाही व श्वास घ्यायला ही त्रास होत आहे तरी आपणास विनंती आहे की सदरचं बांधकाम काढून घेण्यात यावं
साहेब आपल्या माहितीसाठी मी 80 वर्षाचा कॅन्सरग्रस्त पेशंट आहे व माझी पत्नी गेली 11 महिने अंथरुणावर झोपून आहे जर हे बांधकाम झाल्यास आम्हाला श्वास घेण्याचे त्रास होईल उजळणी येणार नाही आणि आमच्या जीवितास धोका आहे तरी आपणास विनंती आहे की आमच्या वया मनाचा बघून तरी हे बेकायदेशीर बांधकाम काढून टाकण्यात यावं असा विनंती अर्ज मुख्यमंत्री शिंदे यांना पुरोहित कुटुंबाने केला आहे यावर मुख्याधिकारी काय कारवाई करणार याकडे सगळयांचे लक्ष लागले आहे

Adv