पालिका कर्मचाऱ्यांना 17 हजारंचा बोनस . उदयनराजेंचे कर्मचाऱ्यांनी मानले आभार

54
Adv

आमचे वडील कै.प्रतापसिंहमहाराज उर्फ दादामहाराज हे या नगरीचे प्रथम नागरीक होते, त्याही पूर्वीपासून सातारा
नगरपरिषदेचे सर्व कर्मचारी आमच्या परिवाराचे सदस्य आहेत असे आम्ही समजत आलो आहोत. सातारा नगरपरिषदेच्या
कर्मचा-यांशी आमचे ऋणानुबंधाचे संबध आहेत आणि ते कधीही संपणारे नाहीत. नगरपरिषदेच्या कर्मचा-यांच्या
सुखदुःखात आम्ही नेहमीच सहभागी होत असतो. यंदाची कोरोना काळातील दिवाळी, नगरपरिषदेच्या कर्मचा-यांना गोड
जावी म्हणून सातारा म्युनिसिपल कामगार युनियन,लाल बावटाचे अध्यक्ष अँड.धैर्यशील पाटील, कार्याध्यक्ष श्रीरंग घाडगे,
आदींच्या बरोबर चार दिवसांपूर्वीच आम्ही चर्चा केली आहे. यंदाच्या वर्षी दीपावली सानुग्रह अनुदान म्हणून १६ हजार
आणि कोरोना प्रोत्साहन भत्ता म्हणून १ हजार असे एकूण १७ हजार रुपयांचे अनुदान देणेबाबत निर्णय घेण्याच्या सूचना
नगराध्यक्षा सौ.माधवी कदम यांना आम्ही दिलेल्या असून, त्यांनी त्याप्रमाणे निर्णय घेतला असल्याचे समजते अशी माहीती
खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिली आहे.
जलमंदिर पॅलेस येथुन दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी नमुद केले आहे

, की सातारा नगरपरिषदेच्या कर्मचा-यांनी कोरोनाच्या काळात अतिशय उल्लेखनिय कार्य केले आहे आणि अजुनही करीत
आहेत. सातारा जिल्हयातील एकूण मृत्यु झालेल्या कोरोना रुग्णापैकी ७० टक्के रुग्णांवर नगरपरिषदेच्या वतीने अंतिमसंस्कार करण्यात येत आहेत. कंन्टेन्टमेंट झोनचे निर्जंतुकीकरण, शहर आणि पेठांमध्ये केलेली औषध फवारणी,
सार्वजनिक स्वच्छता, लॉकडाउनच्या काळात ऐन उन्हाळयात केलेला अखंडीत आणि पुरेसा पाणीपुरवठा, दैनंदिन नागरी
सुविधा या जग बंद असले तरी नगरपरिषदेच्या माध्यमातुन सुरुच होत्या.

सातारा नगरपरिषदेचे कर्मचारी विशेष करुन चतुर्थश्रेणी कर्मचारी हे नेहमीच आपल्या नागरीकांच्या हिताकरीता अहोरात्र कष्ट घेत आहेत. त्यांच्या कर्तव्यभावनेला निश्चितच सलाम करावासा वाटतो. याच भावनेतुन, नगरपरिषदेची आर्थिक स्थिती कोरोनामुळे समस्येच्या गर्तेत असली तरी देखिल कर्मचा-यांप्रती असलेला स्नेहभावामुळे आम्ही दीपावलीचे सानुग्रह अनुदान रुपये १६ हजार प्रत्येकी देण्याबाबत संघटनेशी चर्चा केली आहे. तसेच कोरोना प्रोत्साहन म्हणून रुपये १ हजार देण्यात येणार आहेत. असे मिळून प्रत्येक कायम कर्मचा-याला दीपावलीच्या पार्श्वभुमीवर एकूण रुपये १७ हजार प्रदान करणेबाबत मा.नगराध्यक्षांनी निर्णय तातडीने घ्यावा अशी सूचना केली आहे. त्याप्रमाणे येत्या दोन दिवसांत रक्कमेचे वितरण करण्यात येईल असेही खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी
नमुद केले आहे.

Adv