जिरवाजिरवीच्या राजकारणात पदाधिकाऱ्यांची कारकिर्दीची तीन वर्ष वाया सातारकरांच्या सुख दुःखात सहभागी होण्यासाठी रस्त्यांवर या

60
Adv

टक्केवारीच्या हट्टामुळे साताऱ्यात असुविधांची बजबजपुरी
माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी स्वकियांचा विरोध पत्करून माधवी संजोग कदम या सामान्य गृहिणीला थेट नगराध्यक्ष बनवण्याचा राजकीय चमत्कार28 नोव्हेंबर 2016 मध्ये घडवला . पण सातारकरांच्या अपेक्षेला उतरेल असा कारभार न झाल्याने नगराध्यक्षांच्या तीन वर्षाच्या कारभाराचा भ्रमाचा भोपळा फुटला आहे . सातारा विकास आघाडीचे अंतः स्थ हेवेदावे इतके टोकदार आहेत की नगराध्यक्ष विरूद्ध सातारा विकास आघाडी असा सामना सातत्याने रंगत आला . सभागृह नेत्या स्मिता घोडके पक्ष प्रतोद निशांत पाटील यांचा त्यांच्या केबिनवरील बहिष्कार सातारा विकास आघाडी एकसंघ नसल्याची द्योतक होती . साताऱ्यात गेल्या तीन वर्षात ग्रेड सेपरेटर भुयारी गटार योजना प्रशासकीय इमारत कास धरण उंची या योजनांची कोटी उड्डाणे सातारकर ऐकत आहेत मात्र आजही सातारकरांना ना पक्के रस्ते मिळत आहेत ना मुबलकं पाणी, राजपथावर पार्किंग गायब करून गाळे काढणाऱ्यांची टक्केवारी घ्यायची आणि मोती चौकात एखाद्या गरीबाची पथारी उचलून अतिक्रमण मोहिम राबवल्याचा ढोल बडवायचा , माधवीताईना साताऱ्याची ही तऱ्हा हाताळताना कुशल प्रशासक बनायला हवे होते . मात्र आघाडीतले अंतस्थ राजकारण मोडून काढायला त्या अपयशी ठरल्या . निवडून आल्यावर मी सातारकरांसाठी चोवीस तास उपलब्ध आहे असे सांगणाऱ्या नगराध्यक्षांनी नगराध्यक्ष तुमच्या दारी म्हणतं कोणतीही मोठी योजना अथवा त्यांचा पाठपुरावा आग्रहाने केला नाही . उदयनराजे भोसले यांच्या लोकसभा पोटनिवडणूकीच्या पराभवाला शहरातील नगरसेवकांची कार्यशून्यता कारणीभूत ठरली . त्याचा हिशोब अद्याप मांडला गेलेला नाही .

टक्केवारीच्या राजकारणाला सोकावलेले नतद्रष्ट

सातारा पालिकेत तेरा टकक्याचे राजकारण चालते . नगराध्यक्षांच्या केबिनला जाणाऱ्या फाईलला सुद्धा एक दोन टक्के चिकटलेले असतात . ठेवणीतल्या फाईलवर तासाभरात तर वादग्रस्त विषयावरील फाईलवर महिना महिना सही होत नाही . पालिकेचा वार्षिक भाडे अंदाज, व्यापारी गाळे खुल्या जागांचे मंगल कार्यालयाचे भाडे घरपट्टी वसुली चतुर्थ वार्षिक पाहणी ही गरजेची कामे बाजूला ठेऊन फायली हातावेगळ्या करण्याची गडबड असते . त्या विषयात नगराध्यक्षांची गरूडझेप ठरलेली असते . तेरा टक्के ठेकेदारांना वाटायचे म्हटल्यावर ठेकेदाराने बजेट कितीचे बनवायचे त्यातही पालिकेचे इंजिनियर माहीर आहेत . रूपयांची वस्तू दहा रुपयांचे बजेट बनवून बिलो टेंडरने आठ रुपयाला विकायची महाराष्ट्रातल्या कोणत्याच पालिकेत असा महसुली दरोड्याचा मास्टर प्लॅन नसेल गरूड झेपच्या चर्चा नगराध्यक्षांच्या निमित्तानेच होतात . कंत्राटी शिक्षकांचा भविष्य निर्वाह निधीची रक्कम गिळून वर ढेकर देणाऱ्या खाऊ नगरसेवकांकडून विकासाची काय अपेक्षा करायची ? ही गौरवास्पद कामगिरी करणाऱ्यांची भली मोठी यादी तयार आहे . शाहू कला मंदिर वाचवायचे म्हणले तरी तिथेही टक्केवारीचा कचकचून चावलेला . बरं वाहती गंगा दोन्ही बाजूनी सुरू , छपाईचे मार्ग सदर बझारकडून पोवई नाका ते गुरूवार पेठ असे चालत येतात

तात्या तुम्ही पणं माणसांमध्ये या

उपनगराध्यक्ष किशोर शिंदे उर्फ तात्या अत्यंत भला माणूस .पदावर येऊन सहा महिने झाले मात्र कोटेश्वर पुलाची रडकथा तात्यांनी का संपवली नाही याचे आश्चर्य आहे . बोधे हॉस्पिटल समोर कपाळ मोक्ष करून थेट मोक्ष गाठायची काय व्यवस्था आहे . कोटेश्वर पुलाच्या कामात किती मांडवली ….. किती तोडपाणी … ? यामध्ये बऱ्याच मंडळीनी व्यवस्थित हात मारला . तात्या तुम्ही तरी कारभाराचा गाडा व्यवस्थित हाकां . आपल्या नेत्याची उंची आपणच वाढवायची . शिक्षण मंडळाचे तुम्ही पदासिध्द सभापती मात्र तुमच्या मंडळात गौरवास्पद दादागिरी कशासाठी ? शिक्षिकांच्या कष्टांचा भविष्य निर्वाह निधी मिळणाऱ्या हलकट प्रवृत्तींना लाजा वाटायला हव्यात . तात्या तुम्ही त्या टोळक्यात जाऊ नका . ठेकेदारीच्या पाटीलकीचा कीडा सध्या पालिकेतल्या प्रत्येक टेंडरला चावतोच आहे . त्यात एक हिशोब बहाद्दर डायरीत पेन्सिलच्या नोंदी घालत मंथली कलेक्शनचे आकडे जुळवतो . पालिकेच्या स्वतःच्या मालकीच्या घंटागाडयांची निविदा सहा कोटीपर्यंत फुगते कशी ? तात्या तुमच्याकडून पारदर्शी कारभाराच्या अपेक्षा आहेत . त्यासाठी साताऱ्यात रस्त्यावर उतरून आमच्या व्यथा जाणण्यासाठी फक्त माणसांमध्ये या हीच सातारकर म्हणून नम्र विनंती .

Adv