सातारा पालिकेच्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

68
Adv

सातारा पालिका कामगार संघटनेने विविध मागण्यांसाठी सोमवारी काम बंद आंदोलन केले . त्यामुळे पालिकेचे सफाई कामकाज पूर्णतः ठप्प झाले . नगराध्यक्षांशी तोंडी चर्चेचा फार्स झाला व मुख्याधिकाऱ्यांच्या गैरहजेरीमुळे लाक्षणिक बंदचा काही उपयोग झाला नाही .

पालिकेच्या 292 कर्मचाऱ्यांनी आज विविध मागण्यांसाठी सोमवारी आंदोलनाचे हत्यार उपसले . कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पालिकेच्या जुन्या प्रवेशद्वारावर सभा घेऊन पालिका प्रशासनाचा निदर्शने करून निषेध केला . सातव्या वेतन आयोगाचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना फरकाचा लाभ देणे, करंजे येथील मंजूर दोन हेक्टर जागा चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना घरांसाठी देणे, एक तारखेला पगार नियमित पगार करणे, कर्मचाऱ्यांना गणवेश व एक हजार रुपये धुलाई भत्ता, 2000 ते2005 या दरम्यान जी भरती झाली नाही

त्यांची त्वरीत भरती करणे, ठेका पध्दत बंद करून रोजंदारीवर कर्मचारी नेमणे, इ मागण्यांसाठी दिवसभर काम बंद आंदोलन करण्यात आले . त्यामुळे सकाळच्या सफाई मोहिमेनंतर 292 कर्मचाऱ्यांनी कामाचा हात आखडता घेतल्याने कामकाज ठप्प झाले . दुपारी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने नगराध्यक्ष माधवी कदम यांच्याशी चर्चा केली . मात्र मुख्याधिकारी शंकर गोरे प्रकृती अस्वास्थामुळे गैरहजर राहिल्याने चर्चेच्या वाटाघाटी पुढे सरकल्या नाहीत . कामगार संघटनेचे मार्गदर्शक ज्येष्ठ विधिज्ञ अॅड डी . व्ही . पाटील यांच्या समवेत कामगार संघटनेचे प्रतिनिधी मुख्याधिकाऱ्यांशी मंगळवारी चर्चा करणार आहे .

Adv