बांधकाम सभापतींच्या प्रभागात निकृष्ट कामांचा धडाका

53
Adv

बांधकाम सभापती मिलिंद काकडे यांच्या प्रभागात निकृष्ट रस्त्याचे कामे चालू असून संबंधित नगरसेविका स्नेहा नलवडे व बांधकाम सभापती त्यांचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे बांधकाम सभापती यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क झाला नाही

दलित योजनेतून सुमारे 75 लक्ष रुपयाचा हा रस्ता मंजूर झाला आहे जरंडेश्वर नाका ते कॅनल पर्यंत रस्त्याचे काम चालू असून सदरचे काम हे निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचे दिसून येते याच प्रभागात सातारा पालिकेचे भाजपचे बांधकाम सभापती मिलिंद काकडे राहतात त्यांनी तरी हा रस्ता दर्जेदार करून घ्यावा अशी मागणी येथील नागरिकांकडून होत आहे

संबंधित कामाचा दर्जा हा थर्ड पार्टी करून तपासून घेण्यात यावा मगच संबंधित ठेकेदारास बिल अदा करावे अशी मागणीही येथील नागरिक करत आहेत

निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदाराचे बिल आदा करू नये व काम दर्जेदार करून घ्यावे अशी मागणी येथील नागरिक करत आहेत तत्पूर्वी संबंधित ठेकेदारास पालिकेत बिल काढण्यासाठी विवेकबुद्धी चा पाठिंबा मिळू नये अशी अपेक्षाही येथील नागरिक करत आहेत आता नगरसेविका स्नेहा नलवडे व बांधकाम सभापती काकडे काय भूमिका घेतात याकडे या प्रभागातील नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे

Adv