वाढीव वीज बिले देवून नागरिकांची पिळवणूक करु नका आ. शिवेंद्रसिंहराजे; तातडीने वाढीव बिले रद्द करण्याची अधिकार्‍यांना सुचना  

63
Adv

कोरोना महामारीमुळे गेले तीन महिने लॉक डाऊन सुरु होता. या कालावधीत वीज वितरण कंपनीकडून ग‘ाहकांचे मीटर रिडिंग केले गेले नाही तसेच वीज बिलेही दिली गेली नाहीत. आता लॉक डाऊन संपल्यानंतर ग‘ाहकांना एकदम तीन महिन्यांचे बील दिले गेले आहे. तसेच मनमानी करत सरासरी बिल आकारणी करुन ग‘ाहकांना वाढीव बिले देण्यात आली आहे. यामुळे नागरिकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार असून बिले कमी करुन घेण्यासाठी हेलपाटे मारावे लागत आहेत. वीज वितरण कंपनीने तीन महिन्यापुर्वी ज्या रकमेचे बील होते, त्याच सरासरीने बिल आकारणी करावी. तातडीने वाढीव बिले रद्द करुन ग‘ाहकांचा मनस्ताप थांबवा, अशा सक्त सुचना आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकार्‍यांना केल्या.

यासंदर्भात आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी कंपनीच्या कृष्णानगर येथील मु‘य कार्यालयात जावून प्रभारी अधिक्षक अभियंता सुनिलकुमार माने आणि इतर अधिकार्‍यांची भेट घेतली तसेच निवेदनही दिले. यावेळी नगरसेवक अमोल मोहिते, राजू गोरे, हर्षल चिकणे आदी उपस्थित होते. लॉक डाऊनमुळे लोकांचे उद्योगधंदे बंद होते. उत्पन्नाची साधने बंद होती. असं‘य लोकांच्यापुढे रोजीरोटीचा प्रश्‍न होता. आता लॉकडाऊन उठला असला तरी, जनजीवन पुर्वपदावर येण्यासाठी थोडा वेळ जाणार आहे. हातावर पोट असणार्‍या लोकांचे व्यवसाय, हातगाडे, चहा, वडापावचे गाडे अजूनही सुरळीत सुरु नाहीत. अनेक छोटे व्यवसाय पुर्ण क्षमतेने सुरु नाहीत. त्यामुळे लोकांकडे पैशांची चणचण आहे. अशा परिस्थितीत वीज वितरण कंपनीने नागरिकांना वाढीव बिले देवून त्यांच्या अडचणीत भर टाकली आहे. तीन महिन्यांपुर्वी ज्या रकमेचे बील होते ते आता वाढवून आले आहे. ज्यांचे बील शंभर रुपये होते त्यांना दीडशे तर, ज्यांचे दोनशे आहे त्यांना तीनशे, साडेतीनशे अशी वाढीव बिले आली आहे. आधिच आर्थिक अडचणीत सापडलेल्या लोकांना वाढीव बीलाची रक्कम भरणे शक्य नाही. तसेच बीलाची रक्कम कमी करण्यासाठी नागरिकांना हेलपाटे मारावे लागत आहेत. या सर्व बाबी चुकीच्या असून ग‘ाहकांना होणारा मनस्ताप त्वरीत थांबवणे आवश्यक आहे. त्यामुळे तीन महिन्यांपुर्वी ग‘ाहकांना जे वीज बील आले होते, त्याप्रमाणे सरासरी बीलाची आकारणी करुन ती बीले भरुन घेण्याची व्यवस्था कंपनीने तातडीने करावी.
पुर्वी ज्या रकमेची बीले येत होती त्यामध्ये आणि आता दिलेल्या बिलांमध्ये मोठी तङ्गावत असून वाढीव बिल आल्याने नागरिकांमध्ये तिव‘ संतापाची भावना आहे. तसेच बिलांचा भरणा करण्यासाठी आणि बिलाची रक्कम कमी करुन घेण्यासाठी अर्ज कंपनीमार्ङ्गत भरण्यास सांगितला जात आहे. त्यासाठी बिल भरणा केंद्रांवर नागरिकांच्या रांगा लागत आहेत. कोरोनाचे संकट अद्यापही टळले नसल्याने गर्दी टाळणे आवश्यक आहे. गर्दीमुळे कोरोनाचा धोका वाढू शकतो, याचे भान कंपनीने ठेवावे. वाढीव बिलांमुळे ग‘ाहकांना आर्थिक भुर्दंड बसत असून त्यांना नाहक त्रासही होत आहे. त्यामुळे तातडीने निर्णय घेवून ग‘ाहकांना पुर्वी आलेल्या बीलानुसार सरासरी बील आकारणी करावी आणि त्यापध्दतीने बीले भरण्याची व्यवस्था करावी. तसेच कोरोना पासून संरक्षण होण्यासाठी बील भरणा केंद्रांवर गर्दी होणे टाळावे. याबाबत त्वरीत कार्यवाही करावी, अशी सुचना आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकार्‍यांना केली.
चौकट— कोणाचेही कनेक्शन तोडू नका
दरम्यान, मीटर रिडींग घ्यावे आणि मगच ग‘ाहकांकडून बिलाची मागणी करावी. यासाठी तुमची माणसे लावून रिडिंगची खात्री करुन घ्या. तसेच गर्दी टाळण्यासाठी आणि ग‘ाहकांच्या सोयीसाठी राजवाडा, पोवई नाका, सदरबझार या ठिकाणी तक‘ार निवारण केंद्र सुरु करा. दुकान तीन महिने बंद असूनही हजारो रुपये बिल येते, म्हणजे काहीतरी चुकीचे आहे, हे समजून घ्या. बिल भरले नाही म्हणून कोणाचेही कनेक्शन तोडू नका, कोणावर दबाव टाकू नका. ग‘ाहक, खास करुन वृध्द आणि महिलांशी कंपनीच्या कर्मचार्‍यांनी सौजन्याने बोलावे, याची काळजी घ्या, अशा सुचनाही आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी केल्या. याबाबत तातडीने कार्यवाही करु, असे माने यांनी सांगितले.  

Adv