खा श्री छ उदयनराजे भोसले यांची शपथ ठरली आगळी-वेगळी

36
Adv

राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदारांनी आज खासदारकीची शपथ घेतली. राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांच्या दालनामध्ये हा शपथविधी सोहळा पार पाडला. यात नवनिर्वाचित खासदारांमध्ये राज्यातील राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, काँग्रेस नेते राजीव सातव, भाजप नेते छत्रपती उदयनराजे भोसले, शिवसेना नेत्या प्रियंका चतुर्वेदी आणि भाजपच्या भागवत कराड यांचा समावेश होता. पण, यात उदयनराजेंची शपथ वेगळी ठरली.

काँग्रेसचा पक्षाचा हात सोडून शिवसेनेचा झेंडा हाती धरलेल्या नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनी पहिल्यांदा खासदारकीची शपथ घेतली. व सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी राज्यसभेची इंग्रजीतून शपथ घेतली. त्यानंतर श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनीही इंग्रजीतून शपथ घेतली. पण, शपथ घेतल्यानंतर उदयनराजे भोसलेंनी ‘जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी…जय शिवाजी’ असा जयघोष करत शपथ पूर्ण केली.
दरम्यान, आठवले आणि उदयनराजेंनी इंग्रजी, शरद पवारांनी हिंदी, तर कराड, सातव, चतुर्वेदी यांनी मराठीतून शपथ घेतली.

Adv