औंध संस्थानचा सर्वांचा लाडका मोती ऊर्फ गजराजचे बुधवारी
सकाळी मथुरा येथील वाईल्डलाईफ केअर सेंटरमध्ये निधन झाले.निधनाची वार्ता औंधमध्ये धडकताच औंध वासीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला
गजराज मोतीच्या रूपाने कुटुंबातील आणखी एक सदस्य हरपला असून लॉकडाऊनमुळे प्रत्यक्ष जाऊन मोतीचे,अंतिम दर्शन घेता आले नाही. ही खंत मनात कायम राहील.असे गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी म्हणाल्या मोतीचे आणि आमच्या कुटुंबाचे चार पिढ्यांचे भावनिक नाते होते
गेल्या आठवड्यापासून तो आजारी होता मी दररोज केअर सेंटरच्या संपर्कात राहून माहिती घेत होते.औधमधील ही अनेक मंडळी मोतीला प्रत्यक्ष जाऊन भेटून आले होते मात्र कधीही न भरून येणारी पोकळी गजराज मोतीच्या रूपाने निर्माण झाली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले