लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी न मिळाल्याने दादाचे धैर्य खचले असल्याची चर्चा दक्षिण,उत्तरेसह जिल्ह्यातील पारावर चांगलीच रंगू लागली आहे..
लोकसभा निवडणुकीसाठी अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले होते साताऱ्या शहरात उमेदवारी मिळू नये म्हणून काही जणांनी दिल्ली ते गल्ली पासून लॉबिंग केले होते हे लॉबिंग करण्या साठी या दादाला तीन महिने झटावं लागलं यात मात्र यश आलं नाही आता ह्योच जिल्ह्यातील दादा विधानपरिषदेसाठी इच्छुक असून या फेरीतूनही क्लीन बोल्ड झाला असल्याचे थर्ड अंपायरच्या स्क्रीन मध्ये दिसून आले त्यामुळे लोकसभा निवडणुकीसाठी १७ मोदी जॅकेट शिवून ठेवणाऱ्या या दादाला लोकांनी सॅल्यूटच केला असून विधानसभेला तरी मला चानस हवा अशी अर्थ हाक हा दादा मारत असल्याचे आवाज या वाड्यावरून ते त्या वाड्यावरून ते थेट मुंबईतील सागर किनारी धडकत आहे
कोणत्या दादाला संबंधित मतदार संघातील कॅप्टन करायचं हे आता सर्वस्वी टीमचे मालक असलेले (कराड दौऱ्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वापरलेले हे शब्द आहेत) ठरवणार हे निश्चित असून लवकरच लोकसभा निवडणुकीत मनो.. धैर्य वाढलेल्या दादाच्या हातात विधानसभेची बॅट दिसणार हे मात्र नक्की असे चर्चा त्यांच्याच टीम मध्ये रंगत आहे







