Wednesday, May 27, 2026
spot_img
Home Satara District Koregaon सातारा नामाचे वृत्त ठरले खरे शशिकांत शिंदे पुन्हा आमदार

सातारा नामाचे वृत्त ठरले खरे शशिकांत शिंदे पुन्हा आमदार

211
Adv

काही दिवसांपूर्वीच शशिकांत शिंदे पुन्हा होणार आमदार असे वृत्त सातारानामाने प्रसिद्ध केले होते ते आज खरे ठरले असून आमदार शशिकांत शिंदे यांना बिनविरोध विधानपरिषदेचे आमदार म्हणून आज घोषित करण्यात आले असल्याने त्यांना त्याबाबतचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आमदार शिंदे यांच्या निवडीने जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे

विधानपरिषदेच्या नऊ जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी येत्या ११ तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत असल्याने राजकीय घडामोडींना वेग आला होता. माजी मंत्री शिंदे यांना विधीमंडळातील कामकाजाचा तब्बल २० वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी सुरवातीला जावळी मतदारसंघाचे दोन वेळा व त्यानंतर कोरेगावचे दोन वेळा प्रतिनिधित्व केले आहे. आक्रमक नेता, अभ्यासपूर्ण शैलीत विविध प्रश्न मांडून ते सोडवून घेण्याची धमक ठेवणारा, प्रशासनाशी सौहार्दपूर्ण संबंध राखणारा प्रसंगी सार्वजनिक कामे करून घेण्यासाठी कठोरपणा दाखवणारा नेता, अशी त्यांची प्रतिमा आहे. त्यामुळेच पक्षाचे प्रवक्ते म्हणूनही त्यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली होती आता त्याचबरोबर पुन्हा आमदारकीची जबाबदारी त्यांच्यावर आली आहे.

सातारा जिल्हा हा पक्षाचा बालेकिल्ला मानला जातो. तो अबाधित राखण्याची जबाबदारी श्री. शिंदे यांच्यावर आली होती. प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी जिल्हाभर रान उठवले. विधानसभा निवडणुकीत विधानसभेच्या तीन जागा राखण्यात राष्ट्रवादीला यश मिळाले. मात्र, निवडणुकीच्या धावपळीत स्वत:च्या कोरेगाव मतदारसंघात निर्णायक क्षणी लक्ष घालण्यास वेळ अपुरा पडल्याने त्यांना धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले.

राष्ट्रवादीकडून शशिकांत शिंदे यांना निश्चितपणे संधी मिळाली असून त्यासाठीच दस्तुरखुद्द शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, यांच्याकडे शशिकांत शिंदे यांच्या उमेदवारीची आग्रही मागणी केली होती कोरेगाव मतदारसंघातील व सातारा जिल्ह्यातील पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते सांगत आहेत.

Adv