छातीचा कोट करणाऱ्यांना आता जनताच हद्दपार करणार आहे . याची कुणकुण आमच्या आमदार मित्रांना लागली आहे . संगमनमताने केलेल्या कटकारस्थानाचे आश्चर्य सांगायला काही जणांना विसर पडला असा टोला सेना भाजप युतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी आमदार शशिकांत शिंदे यांना लगावला आहे .
जलमंदिर वरून प्रसिद्ध झालेल्या प्रसिध्दीपत्रकात नमूद आहे की ज्यांनी आमच्यासाठी छातीचा कोट केला की कोटाची छाती केली हे शोधण्याची गरज आहे . आणि खरचं छातीचा कोट केला असेल तर त्यांचे धन्यवाद . मात्र सातारा जिल्हावासियांनी आमच्या साठी वेळोवेळी कोट केला आहे त्यांचे आम्ही मनापासून कृतज्ञ आहोत . राजकारण समाजकारण सोडा आमच्या वैयक्तिक वाढदिवसाच्या कार्यक्रमात काही जणांनी संगनमत करून कटकारस्थान केले मात्र जिल्हावासियांनी छातीचा कोट करून हा प्रयत्न हाणून पाडला जर संबधित आमच्या जवळचे असते आमच्या वाढदिवसाच्या कटकारस्थानात सहभागी होऊन गायब राहिले नसते . आपले आई वडिल, स्वकिय व हित चिंतणारे मित्र आपल्यासाठी छातीचा कोट करतात . भारताच्या सीमेवर आपले जवान देशाच्या संरक्षणासाठी छातीचा कोट करतात . जिल्हावासियांनी आमच्यासाठी वेळोवेळी संरक्षणाची भूमिका घेतली आहे
.जनता आपल्याला हद्दपार करणार आहे याची कुणकुण लागल्यानेच त्यांना ज्यांचे आश्चर्य वाटले याचे वक्तव्य केले मात्र संगनमताने त्यांनी जे कारस्थान केले ते सांगायला मात्र ते नक्कीच विसरले असा प्रतिटोला उदयनराजे भोसले यांनी शशिकांत शिंदे यांना लगावला .