बुधवार दि. 1 जानेवारी 2020 रोजी सकाळी 10 वा. कोयना दौलत निवासस्थान सातारा येथून दैनिक पुढारी कार्यालय साताराकडे प्रयाण. सकाळी 10.10 वा. दै. पुढारी सातारा कार्यालयाच्या 86 व्या वर्धापनदिन कार्यक्रमानिमित्त् शुभेच्छा व पुढारीकार पद्मश्री ग.गो. जाधव यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करणेकरीता दै. पुढारी कार्यालय सातारा येथे उपस्थिती.
सकाळी 10.30 वा. दै. पुढारी सातारा येथून दौलतनगर पाटणकडे प्रयाण. सकाळी 11 वा. चाफळ फाटा, उरुल, निसरेफाटा, मल्हारपेठ, नाडे-नवारस्ता, पाटण, येराड ता. पाटण येथे जनतेकडून शुभेच्छांचा स्वीकार. सकाळी 11.45 वा. श्री. येडोबा देवस्थान, येराड ता. पाटण येथे येडोबा देवाचे दर्शनाकरीता उपस्थित. सकाळी 11.55 वा. पाटण मुख्य बाजारपेठेतील श्री. सिध्दीविनायक गणपती दर्शनाकरीता उपस्थित. दुपारी 12.15 वा. पाटण येथून दौलतनगर पाटण येथे आगमन. दुपारी 12.30 वा. दौलतनगर ता. पाटण येथे लोकनेते बाळासाहेब देसाई, स्व. शिवाजीराव देसाई यांचे पुर्णाकृती पुतळा, समाधी अभिवादन तसेच श्री. गणेश मंदीर व मरळी येथील श्री. निनाईदेवी मंदीर दर्शनाकरीता उपस्थिती. दुपारी 1 वा. दौलतनगर ता. पाटण येथील निवासस्थानी आगमन व सदिच्छा भेटी. सायं. 5 वा. दौलतनगर ता. पाटण येथून कराडकडे प्रयाण व कराड येथे दैनिक पुढारीचे वर्धपन दिनानिमित्त कार्यालय भेट. सायं. 5.15 वा. कराड येथून कोयना दौलत निवासस्थान साताराकडे प्रयाण व राखीव.
गुरुवार दि. 2 जानेवारी 2020 रोजी सकाळी 10 वा. कोयना दौलत निवासस्थान सातारा येथून दौलतनगर ता. पाटणकडे प्रयाण. दिवसभर दौलतनगर ता. पाटण येथे राखीव. सोईनुसार दौलतनगर ता. पाटण येथून कोयना दौलत निवास्थान साताराकडे प्रयाण व राखीव.