महायुती मजबूत करण्यासाठी मनोजदादांना विधानसभेत पाठवा

213
{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"transform":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}
Adv

मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली महायुती गटबंधनला साथ द्या व महाराष्ट्र विधानसभेत मनोज घोरपडे यांना पाठवा. असे आवाहन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मसुर येथील सभेत केले. मोदींच्या नेतृत्वाखाली आज देश, देशाच्या सीमा व धर्म सुरक्षित आहे. ही सुरक्षितचा कायम ठेवण्यासाठी महायुती सोबत रहा. असा नारा आदित्यनाथ यांनी दिला.

योगी आदित्यनाथ म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावनभूमीत व यशवंत नगरी कराडच्या भूमीत येण्याचा योग आला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पावन भूमीने संपूर्ण देशाला दिशा देण्याचे काम केले आहे. माझं सौभाग्य आहे की मला हिंदवी साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पावन भूमीमध्ये येता आलं. संपूर्ण भारतात स्वराज्याची परिकल्पना कशी असावी याचे प्रतिक छत्रपती शिवाजी महाराज यांची महाराष्ट्र धरती आहे. सामाजिक, समता, महिलांविषयी आदर असलेले महात्मा फुले, स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे असे सांगणारे बाळ गंगाधर लोकमान्य टिळक, एका आयुष्यात दोनदा जन्मठेपेची शिक्षा भोगणारे वीर सावरकर याच भूमितीले आहेत. महिलांच्या शिक्षणाची पाया रचला त्या सावित्रीबाई फुले यांना मी वंदन करतो. त्यांच्या या भूमीला मी नमन करतो.
२०१७ मध्ये मी उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री झालो तेव्हा आग्रा येथे गेलो होतो. तिथे मुघल म्युझियम आहेया म्युझियमला औरंगजेबांचे नाव देण्याचा प्रयत्न सुरू होता. भारताचा मुघलांशी संबंध काय? मी त्यावेळी विचारले तेव्हा येथे औरंगजेब व मुगल यांचे प्रतीक उभारले जात असल्याचे मला सांगण्यात आले. त्याला मी कडाडून विरोध करत येथे औरंगजेबाचे नाही तर हे म्युझियम छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने करावे. आमची श्रद्धा छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, गुरुगोविंद महाराज, महाराणा प्रताप यांच्याशी आहे. विदेशी आक्रमणाविषयी आमची श्रद्धा कधीच राहू शकत नाही.
आज मोदींच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र मध्ये देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली देश जोडणारी ताकद काम करत आहे. तर दुसऱ्या बाजूला महाबिघाडी गटबंधन हे देश तोडण्यासाठी एकत्र आले आहेत. आपण एकत्र राहीलो पाहिजे. राम मंदिरासाठी पाचशे वर्षे वाट बघावी लागली, काशी विश्वेश्वरय्या, मथुराची अवस्था तीच झाली. छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ल्यांचे वैभव असणारे प्रतीके अतिक्रमित झाली, आमच्या गणपती उत्सवावर, राम उत्सवावर दगडफेक होते. त्यामुळे एक रहा लक्षात ठेवा सर्वांनी एक राहिले पाहिजे. आपली ताकद विखुरता कामा नये. देशाला एकजूट करण्याचे काम मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. आज नवीन भारत आपल्याला पाहायला मिळतो. आज अतिक्रमण करण्याचे पाकिस्तानचे धाडस आहे का असा सवाल योगीजींनी उपस्थित केला. त्यांचे धाडस होऊ शकत नाही. क्योकीं ये नया भारत है छेडेंगे तो छोंडेगे नहीं. सबका साथ सबका विकास हा महायुतीचा नारा असून सगळ्यांना सुरक्षा देण्याचे काम मोदींच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. आज देशाच्या सीमा सुरक्षित आहेत. काशीमध्ये ३७० समाप्त झाले. आज ८० कोटी भारतीयांना मोफत रेशन मिळते. आरोग्यासह विविध योजना लोकांना मिळत आहेत. त्यामुळे माझे लोकांना विशेष निवेदन आहे हे सुशासन, सुरक्षितता, समृद्धी देशात कायमस्वरूपी ठेवण्यासाठी पुन्हा महायुती महाराष्ट्रात व देशात येणे गरजेचे आहे.
उत्तर प्रदेश मध्ये आयोध्या मंदिर झाले. म्हणून देश जोडण्यासाठी महायुती एकत्रपणे काम करत आहे. महाराष्ट्रात महाबिघाडी लांब ठेवण्यासाठी महायुती सोबत रहा, कराड उत्तर मधून मनोज घोरपडेंना विधानसभेत पाठवा असे आव्हान त्यांनी केले.
मनोजदादा घोरपडे म्हणाले, कराड उत्तर गेल्या पंचवीस वर्षांपासून परिवर्तनाच्या प्रतीक्षेत आहे. आजूबाजूच्या मतदारसंघाचा विकास झाला मात्र कराड उत्तर विकासापासून वंचित आहे. या मतदारसंघाचे प्रश्न, पाण्याचे प्रश्न सोडविण्यासाठी सर्वांनी साथ द्यावी. महायुतीच्या माध्यमातून कराड उत्तरचा कायापालट करुन सर्व सामान्य माणसाला न्याय मिळवून देणारे काम करु. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, विक्रम पावसकर व विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.

Adv