छ उदयनराजे यांचे आणखीन एक स्वप्न पूर्ण मेडिकल कॉलेजसाठी 495 कोटी ची मान्यता

397
Adv

खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या पाठपुराव्याला अखेर यश आले असून साताऱ्याच्या मेडिकल कॉलेज साठी 495 कोटी रुपयांचा निधी आज मंजूर झाला असल्याने खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे अजून एक स्वप्न पुर्ण झाल्या असल्याचे दिसून येते

तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी साताऱ्यात कास धरणाची उंची ,ग्रेड सेपरेटर त्याचबरोबर साताऱ्याचा जिव्हाळ्याचा प्रश्न असलेला म्हणजे मेडिकल कॉलेज हे प्रश्न मार्गी लावावेत अशा मागण्या केल्या होत्या या पाठपुराव्याला आज यश आल्याचे दिसून येते वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री अमित देशमुख यांनी साताऱ्याच्या मेडिकल कॉलेज साठी 495 कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याने खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे स्वप्न आता लवकरच साकार होणार असल्याचे दिसून येते

सातारा जिल्ह्याच्यादृष्टीने अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्‍न बनलेल्या मेडीकल कॉलेज उभारणीसाठी मूर्त स्वरूप प्राप्त झाले असून कॉलेजच्या जागा हस्तांतरणानंतर आता १०० विध्यार्थी क्षमतेचे महाविद्यालय आणि ५०० खाटांचे रुग्णालय उभारणीसाठी एकूण ४९५ कोटी ४६ लाख एवढ्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे

जिल्हावासियांच्या मेडिकल कॉलेजचे स्वप्न आता सत्यात उतारण्याला मूर्त स्वरूप प्राप्त झाले आहे. लवकरच निविदा प्रक्रिया आणि इतर प्रशासकीय सोपस्कार पूर्ण होऊन प्रत्यक्ष मेडिकल कॉलेज उभारणीला प्रारंभ होणार आहे

Adv