मटन दर वाढी विरोधात सातारा जिल्हाधिकार्‍यांना निवेदन सादर

135
Adv

गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूरमध्ये मटणासाठी नागरिक रस्त्यावर उतरले होते. या अभिनव आंदोलनाचे लोण आता सातार्‍यातही पोहोचले आहे. आज सातारा जिल्ह्यातील मटणाचे दर स्थिर करण्याबाबत जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले.

मटणाचा दर कितीही होवो, परंतू मटण खाणारच! परंतू या मटणाचे दर जनसामान्यांच्या आवाक्याबाहेर जाऊ लागल्याने दर आवाक्यात यासाठी सातारकर नागरिकांनी िल्हाधिकार्‍यांना निवेदन देऊन दर कमी करावे अशी विनंती केली आहे

या निवेदनामध्ये मटणाच्या दर निश्‍चितीसाठी गैरशासकीय कमिटीची स्थापना करुन विक्रेते व ग्राहक यांच्यात समन्वय साधून शहर व ग्रामीण भागातील मटण दराची निश्‍चिती करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

Adv